Saturday, December 06, 2025 05:22:24 PM

Aadhaar Update: पालकांनो लक्ष द्या! मुलांचे आधारकार्ड वेळेत अपडेट करा, नाहीतर मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल; स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया जाणून घ्या

लहान मुलांचे आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य.

aadhaar update पालकांनो लक्ष द्या मुलांचे आधारकार्ड वेळेत अपडेट करा नाहीतर मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया जाणून घ्या

Aadhaar Update: मुलांचे आधार कार्ड ही आजच्या काळात अत्यंत महत्वाची ओळखपत्रे मानली जाते. शाळा, कॉलेज प्रवेश, सरकारी योजना, आणि इतर अधिकृत पडताळणी प्रक्रियांसाठी आधार कार्ड अनिवार्य असते. मात्र, अनेक पालकांना माहिती नसते की मुलांचे आधार कार्ड फक्त बनवून ठेवणे पुरेसे नाही; त्याचे योग्य वेळेत अपडेट करणेही अनिवार्य आहे.

UIDAIच्या नियमांनुसार मुलांचे आधार कार्ड दोन महत्त्वाच्या टप्प्यांवर अपडेट करणे आवश्यक आहे. पहिले अपडेट 5 वर्षांच्या वयानंतर आणि दुसरे 15 वर्षांनंतर. हे अपडेट न केल्यास भविष्यात शाळा-कॉलेज प्रवेश, सरकारी पडताळणी, तसेच स्पर्धा परीक्षा किंवा इतर अधिकृत कामकाजात अडथळे निर्माण होऊ शकतात.

5 वर्षांच्या मुलांसाठी अपडेट का आवश्यक आहे?
लहान मुलांचे जन्मानंतर बनवलेले आधार कार्ड बायोमेट्रिक माहिती शिवाय तयार होते. म्हणजेच, त्यात फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅन किंवा चेहऱ्याचा फोटो सामील नसतो. मात्र, मुला/मुलीचा वय 5 वर्षांचा झाल्यावर ही माहिती जोडणे अनिवार्य ठरते. या प्रक्रियेला UIDAI मध्ये Mandatory Biometric Update (MBU) किंवा बाल आधार अपडेट असे म्हणतात. या अपडेटमुळे मुलांचे आधार कार्ड पूर्णपणे वैध आणि अधिकृत ठरते.

15 वर्षांच्या वयानंतरचे अपडेट का आवश्यक आहे?
मुलांचा शारीरिक विकास होत राहतो, त्यामध्ये फिंगरप्रिंट, चेहरा आणि आयरिसची रचना बदलते. म्हणून 15 वर्षांच्या वयापर्यंत आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. या अपडेटशिवाय पुढील गोष्टींमध्ये अडथळे येऊ शकतात – शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेश, स्पर्धा परीक्षा, ओळख पडताळणी, सरकारी योजना किंवा बँकिंग व्यवहार.

फी लागते का?
मुलांचे आधार अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क लागू नाही. UIDAI ने ही सेवा पूर्णपणे मोफत ठेवलेली आहे. पालकांनी कोणत्याही तृतीय पक्षाकडून पैसे देऊ नयेत, अन्यथा फसवणुकीचा धोका असतो.

बाल आधार अपडेट कसा करावा?
पालकांनी सर्वप्रथम uidai.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अपॉइंटमेंट बुक करावी. ठरलेल्या दिवशी मुलासह जवळच्या आधार नामांकन केंद्रावर जावे. प्रक्रिया करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत. जन्म प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, पालकांचे आधार कार्ड आणि योग्य ओळखपत्र. केंद्रावर मुलाचे फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅन आणि फोटो घेण्यात येतो. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुलांचे आधार कार्ड अद्ययावत आणि वैध बनते.

पालकांनी ही प्रक्रिया वेळेवर करून मुलांचे आधार कार्ड अपडेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य अपडेट न केल्यास भविष्यातील शैक्षणिक व सरकारी कामकाजात अनावश्यक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे 5 आणि 15 वर्षांच्या टप्प्यावर मुलांचे आधार अपडेट करणे ही जबाबदारी आणि गरज दोन्ही आहे.


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या