Snakebite : अजब धाडस! नवऱ्याला वाचवण्यासाठी पत्नीने तोंडाने शोषलं कोब्राचं विष; त्यानंतर…

साप चावल्यानंतर काही वेळातच त्या शेतकऱ्याचे बोट प्रचंड सुजले आणि त्याला तीव्र चक्कर येऊ लागल्यामुळे कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. सुरुवातीला त्याची पत्नी पूर्णपणे बरी दिसत होती, मात्र..

Snakebite : अजब धाडस! नवऱ्याला वाचवण्यासाठी पत्नीने तोंडाने शोषलं कोब्राचं विष; त्यानंतर…

Woman Sucks Cobra Venom from Husband : चित्रपटांमध्ये सर्पदंश झालेल्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी जखमेतील विष तोंडाने चोखून बाहेर काढल्याचे अनेक सीन्स आपण पाहतो. असाच एक रील लाईफ प्रकार रिअल लाईफमध्ये घडला असून, त्याचे परिणाम मात्र अत्यंत धक्कादायक ठरले आहेत. शेतात काम करत असताना एका शेतकऱ्याला अत्यंत विषारी समजल्या जाणाऱ्या कोब्रा सापाने दंश केला. पतीला वाचवण्यासाठी तिथेच जवळ उभ्या असलेल्या पत्नीने कसलाही विचार न करता, थेट तोंड लावून नवऱ्याच्या शरीरातील विष बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. पण यामुळे पतीसोबतच पत्नीचा जीवही एका मोठ्या संकटात सापडला.

विष शोषून घेतल्यानंतर पत्नीची प्रकृती खालावली
साप चावल्यानंतर काही वेळातच त्या शेतकऱ्याचे बोट प्रचंड सुजले आणि त्याला तीव्र चक्कर येऊ लागल्यामुळे कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. सुरुवातीला त्याची पत्नी पूर्णपणे बरी दिसत होती, मात्र काही तासांनंतर तिला या धाडसाचा मोठा फटका बसला. तिच्या तोंडात, जिभेवर आणि चेहऱ्यासह हात-पायांवर अचानक बधिरता येऊ लागली. दुसऱ्या दिवशी तिची प्रकृती कमालीची खालावल्यामुळे तिलाही त्याच रुग्णालयात तातडीने दाखल करावे लागले. डॉक्टरांच्या तपासणीत दोघांच्याही शरीरात नागाचे विष पसरल्याचे स्पष्ट झाले, मात्र योग्य वेळेत प्रतिविष (Anti-venom) आणि उपचार मिळाल्याने काही दिवसांतच दोघेही सुरक्षितपणे घरी परतले. चीनच्या युनान प्रांतात ही घटना घडली.

हेही वाचा – Ayatollah Ali Khamenei Funeral: इस्लामिक नियम बाजूला ठेवून खामेनींचा मृतदेह 4 महिने का जतन करण्यात आला? इराणच्या 'त्या' गुप्त निर्णयाचा खुलासा

तोंडाने विष काढणे ठरते जीवघेणे
या अत्यंत गंभीर घटनेनंतर डॉक्टरांनी सर्पदंशाबाबत एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, सापाचे विष काही सेकंदांतच मानवी शरीरातील उती आणि रक्तप्रवाहात वेगाने पसरते. अशा परिस्थितीत तोंडाने विष शोषून घेण्याचा प्रयत्न करणे पूर्णपणे चुकीचे आणि अत्यंत धोकादायक आहे. तोंडामध्ये असणाऱ्या छोट्या रक्तवाहिन्यांमधून किंवा हिरड्यांच्या माध्यमातून हे विष थेट शोषणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करते, ज्यामुळे त्या व्यक्तीचाही मृत्यू ओढवू शकतो. चित्रपट किंवा जुन्या समजुतींवर विश्वास ठेवून स्वतःचा जीव धोक्यात न घालण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

सर्पदंश झाल्यास नेमके काय करावे?
– कमी हालचाल करा: साप चावलेल्या व्यक्तीची हालचाल शक्य तितकी कमी ठेवावी, जेणेकरून विष शरीरात वेगाने पसरणार नाही.
– तातडीने रुग्णालय गाठा: घरगुती किंवा  बुवाबाजीचे, अंधश्रद्धेचे उपाय न करता रुग्णाला थेट जवळच्या सरकारी किंवा मोठ्या रुग्णालयात घेऊन जावे.
– सापाची ओळख पटवा: शक्य असल्यास दंश करणाऱ्या सापाचा फोटो काढावा किंवा त्याची नीट ओळख लक्षात ठेवावी; जेणेकरून, डॉक्टरांना योग्य प्रतिविष देण्यास सोपे होईल.

हेही वाचा – Buldhana Father-Daughter Viral Video : बापाची अनोखी “बेटी पढाओ” मोहीम; शाळेच्या पहिल्या दिवशी लेकीची थेट उंटावर बसवून शाळेत पाठवणी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number