Bank Holiday In March 2026: बँकेची कामे वेळेत उरका! मार्चमध्ये ‘इतके’ दिवस बँका राहणार बंद; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, मार्च महिन्यात देशभरात विविध सण आणि कारणांमुळे तब्बल 11 दिवस बँका बंद राहणार आहेत.<br/>

Bank Holiday In March 2026: बँकेची कामे वेळेत उरका! मार्चमध्ये ‘इतके’ दिवस बँका राहणार बंद; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bank Holiday: मार्च महिना सुरू होण्यासाठी काही दिवस बाकी आहेत. जर तुम्हाला मार्च महिन्यात बँकेशी संबंधित काही महत्त्वाची कामे करायची असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, मार्च महिन्यात देशभरात विविध सण आणि कारणांमुळे तब्बल 11 दिवस बँका बंद राहणार आहेत.

महाराष्ट्रातील बँकांना कधी सुट्टी असेल?
महाराष्ट्रात विशेषतः होळी, गुढीपाडवा आणि रामनवमी या सणांच्या निमित्ताने बँका बंद राहतील:

2 मार्च: होलिका दहन
3 मार्च: धुलिवंदन (होळी)
19 मार्च: गुढीपाडवा (मराठी नववर्ष)
26 मार्च: रामनवमी
31 मार्च: महावीर जयंती

देशभरातील बँक सुट्ट्यांचे वेळापत्रक (मार्च 2026): 

2 मार्च –  होलिका दहन, विविध राज्ये
3 मार्च – धुलिवंदन, बहुतांश राज्ये
4 मार्च -होळी (दुसरा दिवस) नवी दिल्ली, पाटणा, लखनौसह अनेक शहरांमध्ये बँका बंद असतील. 
13 मार्च – चपचार कुट – ऐझवाल
17 मार्च – शब-ए-कद्र – जम्मू आणि श्रीनगर बँका बंद असतील
19 मार्च –  गुढीपाडवा/उगादी – मुंबई, नागपूर, बेंगळुरू, चेन्नई, पणजीमध्ये बँका बंद असतील. 
20 मार्च- ईद-उल-फित्र / रमजान – कोची, श्रीनगर, त्रिवेंद्रम बँका बंद असतील
21 मार्च – रमजान-ईद / सरहुल    कोची – शिमला वगळता देशभर सुट्टी 
26 मार्च – रामनवमी (भाग 1) – मुंबई, नागपूर, जयपूर, कोलकाता, कानपूर बँका बंद असतील. 
27 मार्च –  रामनवमी (भाग 2)-    भोपाळ, पाटणा, हैदराबाद, विजयवाडामध्ये बँका बंद असतील. 
31 मार्च – महावीर जयंती-    मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, अहमदाबादमध्ये बँका बंद असतील.  

हेही वाचा – PMMVY: प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेला 9 वर्षे पूर्ण! गरोदरपणात खात्यात जमा होतात 5000 रुपये; दुसऱ्यांदा मुलगी झाली तर 'हा' लाभ

ऑनलाइन बँकिंग सेवा 24 तास सुरू
बँकांच्या शाखा बंद असल्या तरी, ऑनलाइन बँकिंग, नेट बँकिंग आणि UPI सेवा 24 तास सुरू राहतील. तसेच, एटीएममधून रोख रक्कम काढण्याची सुविधाही उपलब्ध असेल. तथापि, चेक क्लिअरन्स किंवा महत्त्वाच्या कागदपत्रांच्या कामासाठी ग्राहकांनी सुट्ट्यांचे नियोजन करूनच बँकेत जावे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number