Global Metal Market Trends : सर्वांचं लक्ष सोने-चांदीकडे, ‘या’ धातूने मारली बाजी; चीनची रणनीती आणि मध्य-पूर्वेतील हालचालींमुळे मोठी तेजी

अमेरिका आणि इराणमधील तणावाचा जागतिक बाजारावर परिणाम होत आहे. यामध्ये औद्योगिक धातूंना नवीन बळ मिळाले आहे.

Global Metal Market Trends : सर्वांचं लक्ष सोने-चांदीकडे, ‘या’ धातूने मारली बाजी; चीनची रणनीती आणि मध्य-पूर्वेतील हालचालींमुळे मोठी तेजी

Industrial Metal Prices in India 2026 : जागतिक बाजारपेठेत सध्या गुंतवणूकदारांचे लक्ष सोन्या-चांदीच्या दरांकडे असतानाच, तांब्याने (Copper) गुपचूप मोठी उभारी घेतली आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस मध्य-पूर्वेतील युद्धामुळे औद्योगिक धातूंच्या किमतीत मोठी पडझड झाली होती, मात्र आता परिस्थिती बदलताना दिसत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीच्या पार्श्वभूमीवर, तांब्याचे दर गेल्या 3 महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. इंधनाच्या वाढत्या किमती आणि आर्थिक मंदीच्या भीतीनंतर आता बाजारपेठेत पुन्हा एकदा 'मेटल'चा धमाका पाहायला मिळत आहे.

शांतता चर्चेचा धातू बाजारावर सकारात्मक परिणाम
अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी-जास्त होत आहे. यामध्ये औद्योगिक धातूंना नवीन बळ मिळाले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) होणाऱ्या तेल वाहतुकीवरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. शिवाय, गुंतवणूकदार विविध पर्याय आजमावून पाहात आहेत. याच वातावरणामुळे तांब्याच्या किमतीत 1.8 टक्क्यांची वाढ होऊन त्या प्रति टन 13,284.50 डॉलर्सवर पोहोचल्या आहेत.

चीनची 'खोडी' आणि सल्फ्युरिक ॲसिडचा तुटवडा
तांब्याच्या किमती वाढण्यामागे चीनमधील अंतर्गत घडामोडी हे एक प्रमुख कारण ठरले आहे. सल्फ्युरिक ॲसिडच्या निर्यातीवर चीनने अलीकडेच बंदी घातली असून, याचा थेट परिणाम तांबे वितळवणाऱ्या कारखान्यांवर (Smelters) झाला आहे. तांब्याच्या उत्पादनावेळी सल्फ्युरिक ॲसिड हे उप-उत्पादन म्हणून मिळते, ज्याच्या विक्रीतून कारखान्यांना मोठा नफा होतो. मात्र, निर्यात बंदीमुळे हा नफा घटल्याने चिनी स्मेल्टर्सनी तांब्याचे उत्पादन कमी केले आहे. पुरवठ्यातील या घट मुळे जागतिक बाजारात तांब्याचे भाव वधारले आहेत.

हेही वाचा – DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 2 टक्के वाढ; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, पाहा किती वाढणार तुमचा पगार

इतर औद्योगिक धातूंची स्थिती
तांब्याच्या दरात तेजी असली तरी इतर धातूंमध्ये संमिश्र कल दिसून येत आहे. तांबे 1.8 टक्क्यांनी वधारले असताना, ॲल्युमिनियमच्या किमतीत 1.2 टक्क्यांची घसरण झाली असून तो प्रति टन 3,563 डॉलर्सवर आला आहे. मात्र, इतर मूलभूत धातूंनी (Base Metals) तांब्याच्या पावलावर पाऊल ठेवत वाढ दर्शवली आहे. औद्योगिक वापरासाठी तांब्याची मागणी सातत्याने वाढत असल्याने आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे ही तेजी दीर्घकाळ टिकून राहू शकते, असा अंदाज अनेक बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

गुंतवणूकदारांसाठी तांबे ठरतेय 'नवे सोने'
सामान्यतः लोक सोन्याच्या गुंतवणुकीला प्राधान्य देतात, परंतु सध्या तांब्याने दिलेला परतावा पाहता मोठ्या गुंतवणूकदारांचा कल औद्योगिक धातूंकडे वळत आहे. सल्फ्युरिक ॲसिडचा तुटवडा आणि चीनमधील उत्पादन कपातीमुळे पुरवठ्यावर झालेला परिणाम यामुळे किमतींना आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे. मध्य-पूर्वेतील राजकीय स्थिरता आणि चीनची व्यापार धोरणे यावर तांब्याचे भविष्य अवलंबून असेल. सद्यस्थितीत तांब्याने आपली 'चमक' दाखवत जागतिक मेटल मार्केटमध्ये स्वतःचे वर्चस्व सिद्ध केले आहे.

हेही वाचा – LPG Gas Cylinder Booking Rules: LPG सिलेंडर बुकिंगच्या नियमात पुन्हा बदल, आता 'या' पद्धतीने मिळणार गॅस, सरकारने आखला मेगाप्लॅन

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number