NEET UG 2026 re-exam: अवघ्या काही सेकंदांचा उशीर अन् मुंबईत दोन विद्यार्थ्यांचे वर्ष वाया; ‘नीट’ परीक्षा केंद्राबाहेर फुटला अश्रूंचा बांध

मुंबईच्या परळ येथील महर्षी दयानंद कॉलेज या परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास 2 परीक्षार्थींना अवघ्या 2 मिनिटांचा उशीर झाला.

NEET UG 2026 re-exam: अवघ्या काही सेकंदांचा उशीर अन् मुंबईत दोन विद्यार्थ्यांचे वर्ष वाया; ‘नीट’ परीक्षा केंद्राबाहेर फुटला अश्रूंचा बांध

NEET UG 2026 Re-exam: आज देशभरात राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET-UG 2026) अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडली. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) यंदा नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली. मात्र याच नियमांचा अत्यंत हृदयद्रावक फटका मुंबईतील 2 विद्यार्थ्यांना बसला. मुंबईच्या परळ येथील महर्षी दयानंद कॉलेज या परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास 2 परीक्षार्थींना अवघ्या 2 मिनिटांचा उशीर झाला. परंतु, प्रवेशाची वेळ टळल्याचे सांगत परीक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना आत सोडण्यास स्पष्ट नकार दिला. केवळ 2 मिनिटांमुळे वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न भंगल्याचे पाहून या विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले आणि केंद्राबाहेरच त्यांना रडू कोसळले. उपस्थित इतर पालकांनी या मुलांसाठी प्रशासनाकडे गयावया केली, मात्र 'नियमापुढे हतबल' असल्याचे सांगत प्रशासनाने दोन्ही विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याने त्यांचे संपूर्ण वर्ष वाया गेले आहे.

सुमारे 15 हजार विद्यार्थ्यांसाठी कडेकोट बंदोबस्त
दरम्यान, मागील काळातील गोंधळानंतर राज्य सरकारने यंदा विशेष खबरदारी घेतली होती. संवेदनशील मानल्या जाणाऱ्या लातूर आणि पुणे केंद्रांवर करडी नजर ठेवण्याचे थेट आदेश प्रशासनाला देण्यात आले होते. लातूर जिल्ह्यातील 26 परीक्षा केंद्रांवर एकूण 14,687 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त करण्यासाठी प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. याशिवाय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ड्युटी मॅजिस्ट्रेट, वैद्यकीय पथके आणि विशेष निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. केंद्रांवर पोहचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा काळात त्रास होऊ नये म्हणून पिण्याचे पाणी, ज्यूस आणि फळांची सोय महाविद्यालय प्रशासनाकडून करण्यात आली होती.

हेही वाचा – Maharashtra Rain Alert: पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे; कोकणापासून मराठवाड्यापर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज

यवतमाळमध्ये अलर्ट मोड; 2800 हून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य पेटीत बंद
काही महिन्यांपूर्वी 3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द झाल्यानंतर आज दुपारी 2 ते 5:15 या वेळेत ही फेरपरीक्षा घेण्यात आली. यवतमाळ शहरातील 13 केंद्रांवर एकूण 2,847 विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली. मागील अनुभवातून धडा घेत यवतमाळमधील संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा रविवारी 'अलर्ट मोड'वर होती. कोणतीही गडबड किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा केंद्राबाहेर पोलिसांचा तगडा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number