ChatGPT Outage : धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर चॅटजीपीटी डाऊन

NEET प्रकरणावरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर लगेचच जागतिक स्तरावर चॅटजीपीटीची सेवा ठप्प झाली आहे. या दोन मोठ्या घडामोडींनी खळबळ उडाली आहे.

ChatGPT Outage : धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर चॅटजीपीटी डाऊन

आजचा दिवस देशाच्या राजकारणासाठी आणि तंत्रज्ञान विश्वासाठी अत्यंत खळबळजनक ठरला आहे. NEET परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, या मोठ्या राजकीय भूकंपाची बातमी जगभरात वाऱ्यासारखी पसरत असतानाच, AI तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य चॅटबॉट 'ChatGPT' ची सेवा जागतिक स्तरावर अचानक ठप्प झाली आहे. एकाच दिवशी घडलेल्या या दोन मोठ्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात आणि डिजिटल जगतात एकच खळबळ उडाली आहे.

बातम्यांचा पूर अन् चॅटजीपीटी डाऊन
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची बातमी समोर येताच सोशल मीडिया आणि इंटरनेटवर प्रतिकियांचा पाऊस पडू लागला. युजर्स या संपूर्ण घडामोडीचे विश्लेषण करण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवर सक्रिय झाले. परंतु, याच दरम्यान तंत्रज्ञान विश्वातून दुसरी मोठी बातमी आली, जगप्रसिद्ध ChatGPT ची सेवा अचानक विस्कळीत झाली.

ओपनएआयने (OpenAI) दिलेल्या माहितीनुसार, कनेक्टिव्हिटीच्या समस्येमुळे जगभरातील हजारो वापरकर्त्यांना AI सेवा वापरताना अडचणी येत आहेत. 'डाउनडिटेक्टर' (DownDetector) या वेबसाईटनुसार, गेल्या ३० मिनिटांत ही तांत्रिक अडचण निर्माण झाली असून भारत, अमेरिका, युरोप, जपान आणि ऑस्ट्रेलियासह जगातील अनेक देशांमध्ये चॅटजीपीटी पूर्णपणे ठप्प झाले आहे.

डिजिटल जगतात आणि राजकारणात एकच खळबळ
एकीकडे देशातील शिक्षण व्यवस्था आणि राजकारणाला नवे वळण देणारा शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आणि दुसरीकडे दैनंदिन डिजिटल कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या चॅटजीपीटीचे जागतिक सर्व्हर डाऊन होणे, या दोन घटनांमुळे सध्या इंटरनेटवर युजर्समध्ये मोठी चर्चा रंगली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number