Tuesday, November 11, 2025 11:15:59 AM

Shocking Report of DNA Test: गंमत म्हणून डीएनए टेस्ट केली... आणि जे सत्य समोर आलं, ते पाहून सगळं कुटुंबच हादरलं..!

या एका चाचणीने ब्रिटनच्या यॉर्कशायरमधील एका कुटुंबाचं 60 वर्षांपूर्वीचं रहस्य उलगडलं.. मात्र, या प्रकरणाचा शेवट गोड झाली की कटू, ते जाणून घेऊ..

shocking report of dna test  गंमत म्हणून डीएनए टेस्ट केली आणि जे सत्य समोर आलं ते पाहून सगळं कुटुंबच हादरलं

Yorkshire woman Shocked After DNA Test : 'डीएनए (DNA) टेस्ट' म्हणजे काय आणि तिचे नेमके परिणाम काय असतात, हे केवळ उत्सुकतेपोटी पाहण्यासाठी एका महिलेने केलेली एक गंमतच तिच्या आयुष्यातील सर्वात मोठे आणि धक्कादायक गुपित घेऊन आली. या एका चाचणीने ब्रिटनच्या यॉर्कशायरमधील एका कुटुंबाचं 60 वर्षांपूर्वीचं रहस्य उलगडलं.. मात्र, या प्रकरणाचा शेवट गोड झाली की कटू, ते जाणून घेऊ..

जेव्हा स्कॉटलंडमधून आला मेसेज
यॉर्कशायरमध्ये राहणाऱ्या 53 वर्षांच्या जेनेट यांनी एका रिपोर्टमध्ये सांगितले की, त्यांना फक्त आपल्या 'आयरिश वारसा'बद्दल (Irish heritage) माहिती हवी होती, म्हणून त्यांनी मजा म्हणून डीएनए चाचणी ॲपवर आपला नमुना दिला. पण, चार वर्षांनंतर जेव्हा त्यांना स्कॉटलंडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचा मेसेज आला, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

त्या अनोळखी व्यक्तीने मेसेजमध्ये म्हटले: "मला वाटते की, तू माझी बहीण आहेस आणि आपले वडील एकच आहेत!"

जेव्हा हे सत्य समोर आले, तेव्हा जेनेट यांचे 88 वर्षांचे वडील आणि आई 50 वर्षांहून अधिक काळ एकत्र राहत होते. वडिलांना लग्न होण्यापूर्वीच एक मूल होते, ज्याबद्दल कुटुंबाला कोणतीही माहिती नव्हती.

हेही वाचा - Bangkok Road Sinkhole Video : बँकॉकमध्ये चार पदरी रस्ताच जमिनीत गडप झाला! थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

वडिलांना बातमी सांगण्याची भीती
जेनेट यांना या बातमीचा धक्का बसला, कारण त्यांना आपल्या वडिलांना हे सत्य कसे सांगावे, याची भीती वाटत होती. "मला माझ्या वडिलांना हार्ट अटॅक द्यायचा नव्हता," असे त्यांनी सांगितले. मात्र, शेवटी त्यांनी प्रामाणिकपणे सत्य सांगण्याचा निर्णय घेतला.

यावर जेनेट यांच्या 87 वर्षीय आईला कोणतीही चिंता नव्हती, कारण या नवीन भावाचा जन्म तिचे जेनेटच्या वडिलांशी लग्न होण्यापूर्वीच झाला होता. 
जेव्हा जेनेट यांनी वडिलांना ही गोष्ट सांगितली, तेव्हा ते मोठा धक्का बसला. वडिलांनी रात्रभर जागून साठच्या दशकात आपण कोणासोबत डेटिंग करत होतो, हे आठवण्याचा प्रयत्न केला.

नाते तुटले नाही, तर जुळले
जेनेट यांनी सांगितले की, त्यांनी नवीन भावाच्या आईचे नाव वडिलांना सांगितले, पण ते म्हणाले, “मला तिचे नाव आठवत नाहीये. हे खूप वाईट आहे.” वडील त्याबद्दल थोडे शर्मिंदा झाले. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत "न कोणी लग्न तुटले, न कोणाचे कुटुंब," असे जेनेट यांनी स्पष्ट केले.

या कथेचा शेवट मात्र खूप सुखद झाला. कारण, या सर्व घटनांमुळे ज्यामुळे कोणाचंही आयुष्य विस्कटलं नाही, उलट ते अधिक सुंदर झालं. जेनेटच्या या मोठ्या सावत्र भावाने केवळ आपल्या वडिलांशी ऑनलाइन संपर्क साधला नाही, तर 60 वर्षांनंतर त्यांनी एकत्र पहिला फादर्स डे देखील साजरा केला. एका लहानशा गंमतीने हे कुटुंब तुटण्याऐवजी अधिक मोठे आणि आनंदी झाले.

हेही वाचा - Stray Dog Attack a Girl : 'ती' चिमुरडी सापडली पाच भटक्या कुत्र्यांच्या तावडीत; नंतर जे झालं ते पाहून अंगावर येईल काटा


सम्बन्धित सामग्री