Rupee at All Time Low: चलन बाजारात भूकंप! रुपया विक्रमी निचांकी पातळीवर; इराण-अमेरिका संघर्षादरम्यान डॉलर सुसाट

विशेष म्हणजे, 28 फेब्रुवारी रोजी इराणसोबतचा संघर्ष सुरू झाल्यापासून रुपयाचे मूल्य 3 टक्क्यांहून अधिक घसरले आहे.<br/>

Rupee at All Time Low: चलन बाजारात भूकंप! रुपया विक्रमी निचांकी पातळीवर; इराण-अमेरिका संघर्षादरम्यान डॉलर सुसाट

Rupee at All time Low: जागतिक राजकीय तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतीय रुपयाने शुक्रवारी निचांकी पातळी गाठली आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 94.28 या विक्रमी नीचांकी स्तरावर उघडला. भारतीय चलनाने प्रति डॉलर 94 चा 'मानसिक अडथळा' (Psychological Barrier) ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी, 25 मार्च रोजी रुपया 93 वर बंद झाला होता (26 मार्च रोजी बाजार बंद होते). विशेष म्हणजे, 28 फेब्रुवारी रोजी इराणसोबतचा संघर्ष सुरू झाल्यापासून रुपयाचे मूल्य 3 टक्क्यांहून अधिक घसरले आहे.

कच्च्या तेलाचा भडका आणि आयात बिलाचा बोजा
रुपयाच्या या घसरणीमागील मुख्य तांत्रिक कारण म्हणजे 'ब्रेंट क्रूड' तेलाच्या किमती अद्याप प्रति बॅरल 107 डॉलरच्या वर स्थिर आहेत. भारताच्या कच्च्या तेलाच्या एकूण गरजेपैकी तब्बल 88 टक्के तेल आयात केले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्यामुळे भारताचे आयात बिल मोठ्या प्रमाणात फुगते, ज्याचा थेट परिणाम 'चालू खात्यातील तुटीवर' (CAD) होतो. यामुळे परकीय चलन साठ्यावर दबाव निर्माण होऊन रुपयाचे मूल्य सातत्याने कमी होत आहे.

भू-राजकीय तणाव: शांतता चर्चेच्या आशा मावळल्या
इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा सावट जागतिक बाजारपेठेवर कायम आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील ऊर्जा प्रकल्पांवर नियोजित असलेला हल्ला 10 दिवसांसाठी पुढे ढकलला असला, तरी इराणने हा प्रस्ताव एकतर्फी ठरवून फेटाळला आहे. हा संघर्ष लवकर संपण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिणामी, गुंतवणूकदार जोखीम टाळण्यासाठी 'सुरक्षित गुंतवणूक' (Safe Haven) म्हणून डॉलरकडे वळत आहेत, ज्यामुळे डॉलर अधिक मजबूत होत आहे.

हेही वाचा – Gold Silver Rate Today : सोनं पुन्हा महागलं! मोठ्या घसरणीनंतर सोन्याला पुन्हा एकदा चकाकी, चांदीही वधारली

RBI चा हस्तक्षेप आणि तज्ज्ञांचा अंदाज
रुपयाची ही मुक्त घसरण रोखण्यासाठी आता सर्वांच्या नजरा भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (RBI) लागल्या आहेत. रुपयाचे जलद अवमूल्यन थांबवण्यासाठी मध्यवर्ती बँक बाजारात डॉलरची विक्री करून हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत युद्धाची परिस्थिती स्पष्ट होत नाही, तोपर्यंत बाजारातील ही अस्थिरता कायम राहील. जर तणाव निवळला, तर रुपयामध्ये 1 ते 1.5 रुपयांची सुधारणा (Recovery) होऊ शकते. मात्र सद्यस्थितीत चलनावर प्रचंड दबाव आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number