‘पाच हजार फेरीवाल्यांचा बंद, फक्त माझा स्टॉल सुरू, ही मनसेची ताकद’; मराठमोळ्या एकताने मानले राज ठाकरेंचे आभार

शॉरमा स्टॉलच्या उद्घाटनानंतर एकता सावंतने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले.

‘पाच हजार फेरीवाल्यांचा बंद, फक्त माझा स्टॉल सुरू, ही मनसेची ताकद’; मराठमोळ्या एकताने मानले राज ठाकरेंचे आभार

डोंबिवली : काही दिवसांपू्र्वी डोंबिवली परिसरातील एकता सावंत या मराठी तरुणीचा शॉरमाचा स्टॉल महापालिकेने बंद पाडल्याची घटना समोर आली होती. त्यावेळ इतर फेरीवाल्यांचाही तिला त्रास होत असल्याचे तिने म्हटले होते. या परिसरात परिसरात परप्रांतीय देखील व्यवसाय करतात, मात्र पालिकेने फक्त एकता या तरुणीचाच व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले होते. परप्रांतीय जर इकडे येऊन व्यवसाय करतात, तर आम्हाला का रोखलं जात?, असा सवाल करत एकता सावंत हिने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केली होती. हा व्हिडिओ थेट मनसेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचला. लगेचच मनसेच्या कार्यकर्त्यांना सांगून घडलेल्या घटनेची चौकशी करण्यात आली. मनसेचे अविनाश जाधव आणि अविनाश अभ्यंकर या दोघांनीही घटनेची दखल घेत या तरुणीचा स्टॉल पुन्हा सुरू करून दिला. नुकतेच या स्टॉलचे उद्घाटन मनसे नेते अविनाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले असून उद्घाटनानंतर एकताने राज ठाकरे यांचे आभार व्यक्त केले आहे. तिने म्हटले की, आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. ही मनसेची ताकद आहे. आज आजूबाजूचे सर्व पाच हजार फेरीवाले बंद आहे. फक्त माझा स्टॉल सुरू आहे, अशी प्रतिक्रिया एकताने दिली.

हेही वाचा : Navi Mumbai Mayor Election: भाजपचा ‘वन मॅन शो’! नवी मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरपद भाजपाच्याच ताब्यात

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number