EPFO: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विसरलेला जुना PF नंबर आता झटक्यात मिळणार, पैसे काढणं होणार सोपं

EPFOने जुने PF खाते शोधणे आणि UANशी लिंक करणे सोपे केले आहे.

EPFO: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विसरलेला जुना PF नंबर आता झटक्यात मिळणार, पैसे काढणं होणार सोपं

EPFO: EPFOने आपल्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत, जे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहेत. खासगी नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या PF खात्यांसोबत अनेकदा अडचणींचा सामना करावा लागायचा. खासकरून जे लोक २०१४ पूर्वीपासून नोकरी करत आहेत, त्यांच्यासाठी जुने PF नंबर शोधणे आणि जुने खाते मिळवणे फारच कठीण होतं. यासाठी आता EPFOने सोपा उपाय दिला आहे, ज्यामुळे जुने PF खाते सहजपणे शोधता येणार आहे.

कर्मचार्‍यांच्या मते, PF म्हणजे एक महत्वाची बचत रक्कम, जी गरजेच्या वेळी खूप उपयोगी ठरते. पण एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत नोकरी बदलताना जुने PF नंबर आठवत नसेल किंवा त्याची माहिती उपलब्ध नसेल, तर पैसे काढणे किंवा ट्रान्सफर करणे कठीण झाले. EPFOच्या नवीन सुविधेमुळे हे सर्व आता सुलभ होणार आहे.

EPFOच्या युनिफाइड मेंबर पोर्टलवर लॉगिन करून, कर्मचारी काही महत्वाची माहिती, जसे की आधार क्रमांक, पॅन आणि मोबाईल नंबर प्रविष्ट करून, आपल्या जुन्या PF खात्यांचा शोध घेऊ शकतात. या प्रक्रियेत, जुने खाते १० वर्षे जुने असो किंवा १५ वर्षे जुने असो, ते सहज मिळवता येईल. विशेष म्हणजे, जर कर्मचाऱ्याचे KYC पूर्ण असतील आणि आधार UAN शी लिंक असेल, तर जुने आणि नवीन PF खाते सर्व एकाच UAN अंतर्गत जोडलेले असल्याने त्यांचा PF पासबुक पाहणे, ट्रान्सफर करणे आणि पैसे काढणे खूप सोपे होते.

EPFO 3.0 अंतर्गत आणखी एक मोठी सुविधा २०२६ पासून लागू केली जाणार आहे. यानुसार, कर्मचारी आता त्यांच्या PF मधील पैसे एटीएम किंवा UPI द्वारेही काढू शकतील. याचा अर्थ असा की कार्यालयात जाऊन कागदपत्रांच्या झंझटीतून जावं लागणार नाही. ही सुविधा अडचणीच्या वेळी कर्मचार्‍यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे.

EPFOने सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे की, जे लोक २०१४ पूर्वी नोकरी करत होते, त्यांनी आपले जुने PF खाते नक्कीच UAN शी लिंक करावे. बऱ्याच वेळा, जुने PF खाते आणि त्यातील जमा रक्कम काही काळ विसरल्या गेल्यामुळे राहते. आता या नवीन उपायांमुळे लाखो कर्मचाऱ्यांना आपले पैसे परत मिळवण्यास मदत होईल.

एकंदरित, EPFOच्या या बदलांमुळे कर्मचारी बचत आणि त्याच्या व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणावर सुधारणा होणार आहे. जुने PF खाते शोधणे, पैसे ट्रान्सफर करणे, आणि गरजेच्या वेळी सहज पैसे काढणे यासाठी आता फक्त काही मिनिटांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी हा बदल निश्चितच मोठा लाभदायक ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number