Wednesday, November 19, 2025 12:36:11 PM

Play Store Scam: Play Storeवर सरकारी लोगोचा गैरवापर! कॉल हिस्ट्री मिळणार म्हणत लाखो लोकांची फसवणूक

प्ले स्टोरवर सरकारी नाव वापरून फसवणूक करणारा अ‍ॅप लाखोंनी डाऊनलोड केला.

play store scam play storeवर सरकारी लोगोचा गैरवापर कॉल हिस्ट्री मिळणार म्हणत लाखो लोकांची फसवणूक

Play Store scam: गुगल प्ले स्टोर हा लाखो लोकांसाठी अँड्रॉइड अ‍ॅप्सचा मुख्य स्रोत. लोकांच्या मनात एक सरळ सेट धारणा असते. प्ले स्टोर म्हणजे सुरक्षित. पण अलीकडील एका केसमुळे ही समज कमालीची चुकीची असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. कारण प्ले स्टोरवर एक अशी अ‍ॅप सापडली जी स्वतःला 'सरकारी' म्हणून प्रमोट करत होती आणि आश्चर्य म्हणजे तो अ‍ॅप लाखो वेळा डाऊनलोडही झाला.

हा अ‍ॅप लोकांना सब्स्क्रिप्शन प्लान घेऊन कोणत्याही नंबरची कॉल हिस्ट्री मिळवून देऊ शकते असा दावा करत होती. काही लोकांनी तर पैसे देऊन हे प्लानही घेतले. त्यामुळे आता सोशल मीडियावर थेट प्रश्न उपस्थित झालेत गुगलकडून अशा अ‍ॅप्सना व्हेरिफिकेशन न करता प्लॅटफॉर्मवर येऊच कसं दिलं जातं?

कोणता होता अ‍ॅप?

या चर्चेत आलेल्या अ‍ॅपचं नाव होतं ‘Call History of any number’.
याचा लाँच डेटही फार जुना नव्हता सप्टेंबर 2024 मध्येच ती प्ले स्टोरवर दिसू लागली.

ऑब्झर्व्ह झालेले मुद्दे

  • लाखो downloads

  • 4.6 स्टार रेटिंग

  • तीन सब्स्क्रिप्शन प्लान 274 पासून 462 पर्यंत

  • स्वतःला 'Government Approved' असा दावा

या अ‍ॅपमुळे लोक अधिक फसू लागले, कारण 'सरकारी' हा शब्द बहुतेक युजरस् अंधपणे ट्रस्ट करतात.

प्रत्यक्षात मात्र कोणतीही सरकारी अ‍ॅप कॉल हिस्ट्री पैसे देऊन देते हा दावा अविश्वसनीय आणि कायद्यानेही चुकीचा आहे. कॉल रेकॉर्ड्स देण्याचा अधिकार फक्त टेलिकॉम अथॉरिटी आणि कायदेशीर तपास यंत्रणांना असू शकतो.

खरा की बनावट सरकारी अ‍ॅप ओळखायचा कसा?

येथून पुढे युजरांनी अ‍ॅप डाऊनलोड करताना खालील बेसिक चेकलिस्ट वापरावी:

1) Developer Name तपासा
कोणतीही सरकारी अ‍ॅप सरकारचा असला तर त्याचा डेवलपर 'NIC', 'Gov of India', 'Ministry of….' अशा प्रमाणिक नावाखालीच दिसतो.

2) मंत्रालय / विभाग cross verify करा
Play Store वर लिस्टिंग असलं म्हणजे ते खरोखर मंजूर आहे याची हमी नाही.
गूगल सर्च / सरकारी वेबसाईटवरून पडताळणी करा.

3) Subscription घेतंय? तर सावधान!
सरकारी अ‍ॅप कोणत्याही व्यक्तीकडून कॉल हिस्ट्री देत नाही आणि पैसेही मागत नाही. Paid Subscription दिसलं तर 99% ते genuine नसतं.

4) Random link वरून अ‍ॅप डाऊनलोड करू नका
WhatsApp / Telegram वरून शेअर केलेले लिंकवरून अ‍ॅप कधीही डाऊनलोड न करणे.


सम्बन्धित सामग्री