Sunday, November 16, 2025 06:28:30 PM

Amazon Shopping Tips: फेस्टिव सीजनमध्ये ऑनलाइन शॉपिंग करताय? अमेझॉनच्या ‘या’ 9 टिप्स ठेवा लक्षात, नाहीतर होईल नुकसान

दिवाळी आणि नाताळसारख्या सणासुदीच्या काळात ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड झपाट्याने वाढतो.

amazon shopping tips फेस्टिव सीजनमध्ये ऑनलाइन शॉपिंग करताय अमेझॉनच्या ‘या’ 9 टिप्स ठेवा लक्षात नाहीतर होईल नुकसान

Amazon Shopping Tip: दिवाळी आणि नाताळसारख्या सणासुदीच्या काळात ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड झपाट्याने वाढतो. Flipkart, Amazon आणि इतर मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या या काळात सेल्स, ऑफर्स आणि डिस्काउंट्सचा पाऊस पाडतात. मात्र, याच काळात सायबर गुन्हेगारही सक्रिय होतात आणि लोकांना फसवण्यासाठी नव्या पद्धती वापरतात. ग्राहकांनी थोडी काळजी घेतली, तर या फसवणुकीपासून स्वतःचा आणि आपल्या पैशांचा बचाव होऊ शकतो.

अमेझॉनने अलीकडेच गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या Indian Cyber Crime Coordination Centre (I4C) सोबत भागीदारी करत ग्राहकांसाठी विशेष सुरक्षा मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेतून त्यांनी ऑनलाइन फसवणुकीपासून वाचण्यासाठी 9 महत्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत.

हेही वाचा: Vivo V60e भारतात लाँच: 200MP कॅमेरा, 90W फास्ट चार्जिंगसह धमाकेदार फीचर्स; जाणून घ्या, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

1. सायबर फ्रॉडविषयी माहिती ठेवा

फिशिंग, स्कॅम ई-मेल्स, बनावट वेबसाइट्स आणि व्हॉट्सअॅपवरील लिंक्स अशा विविध पद्धतींनी फसवणूक केली जाते. त्यामुळे ग्राहकांनी सायबर फ्रॉडचे प्रकार ओळखून त्याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे.

2. वेबसाइटची विश्वासार्हता तपासा

शॉपिंग करण्यापूर्वी वेबसाइटचा URL नेहमी तपासा. https:// ने सुरू होणारी साइट अधिक सुरक्षित असते. कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळा.

3. पब्लिक Wi-Fi वर पेमेंट करू नका

कॉफी शॉप, रेल्वे स्टेशन किंवा मॉलमधील पब्लिक वायफाय वापरून पेमेंट करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे फक्त स्वतःच्या सुरक्षित नेटवर्कवरूनच व्यवहार करा.

4. सेलर आणि रिव्ह्यू तपासा

खरेदीपूर्वी विक्रेत्याचा प्रोफाइल तपासा. रिव्ह्यू आणि रेटिंग वाचा. बनावट प्रॉडक्ट्सपासून वाचण्यासाठी ही सवय फार उपयोगी ठरते.

5. संशयास्पद संदेशांपासून सावधान रहा

Amazon कधीही पेमेंट किंवा OTP मागण्यासाठी फोन किंवा ईमेल करत नाही. त्यामुळे अशा मेसेजेसना प्रतिसाद देऊ नका.

6. पॉप-अप जाहिरातींपासून दूर राहा

वारंवार येणारे पॉप-अप्स अनेकदा बनावट ऑफर दाखवून आपली माहिती चोरी करण्याचा प्रयत्न करतात. फक्त अधिकृत अॅप किंवा वेबसाइट वापरा.

7. सुरक्षित पेमेंट करा

पेमेंट करताना OTP, कार्ड माहिती किंवा UPI PIN कोणालाही देऊ नका. फक्त अमेझॉनच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवरच व्यवहार करा.

हेही वाचा: UPI Payment Safety: ऑनलाइन फ्रॉड टाळण्यासाठी SEBI ने उचललं मोठं पाऊल; UPI पेमेंट करण्यापूर्वी वापरा 'हे' टूल्स

8. बँक स्टेटमेंट तपासा

प्रत्येक खरेदीचा बिल जतन करा आणि बँक स्टेटमेंट वेळोवेळी तपासा. कोणताही संशयास्पद ट्रान्झॅक्शन आढळल्यास त्वरित बँकेला कळवा.

9. जागरूक राहा, शेअर करा

ऑनलाइन फ्रॉडच्या घटनांबद्दल कुटुंबीय आणि मित्रांनाही सावध करा. जितकी जनजागृती वाढेल, तितके गुन्हेगारांचे प्रयत्न अपयशी ठरतील.

सणासुदीच्या काळात आकर्षक ऑफर्स, मेसेजेस आणि जाहिरातींच्या आहारी न जाता, थोडी खबरदारी घेतली तर आपली बचत आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवता येईल. अमेझॉनच्या या टिप्स प्रत्येक ऑनलाइन खरेदीदाराने लक्षात ठेवायला हव्यात.


सम्बन्धित सामग्री