Tuesday, November 18, 2025 03:20:23 AM

Bijnor Wedding Fight: बिजनोरमध्ये लग्नाच्या मिरवणुकीत चिकन फ्रायवरून हाणामारी! 15 जण जखमी; शेवटी पोलिसांच्या उपस्थितीत पार पडला विवाह

जेवणात कमी चिकन मिळाल्याच्या वादातून वरपक्ष आणि वधूपक्ष यांच्यात जबरदस्त मारामारी झाली. यात तब्बल 15 जण जखमी झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली.

bijnor wedding fight बिजनोरमध्ये लग्नाच्या मिरवणुकीत चिकन फ्रायवरून हाणामारी 15 जण जखमी शेवटी पोलिसांच्या उपस्थितीत पार पडला विवाह

Bijnor Wedding Fight: उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्यात लग्नाचा सोहळा एका छोट्याशा चिकन फ्रायच्या प्लेटवरून रणांगणात बदलला. जेवणात कमी चिकन मिळाल्याच्या वादातून वरपक्ष आणि वधूपक्ष यांच्यात जबरदस्त मारामारी झाली. यात तब्बल 15 जण जखमी झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली. शेवटी, पोलिसांच्या देखरेखीखाली लग्नाचे विधी पार पडले आणि वधूला निरोप देण्यात आला.

नेमकं काय आहे प्रकरण? 

ही घटना बिजनोरच्या नगीना परिसरातील माझेडा तिब्री गावातील ‘फलक मॅरेज हॉल’ येथे घडली. वरपक्ष कोटरा गावातून आला होता. वधूपक्षाकडून पाहुण्यांना जेवण वाढण्याचा कार्यक्रम सुरू होता. याचवेळी काही पाहुण्यांनी तक्रार केली की, आम्हाला चिकन फ्राय फार कमी दिलं जातंय! हे ऐकताच वधूपक्षातील सदस्यांनी चिडून त्यांच्या प्लेटमध्ये भरपूर चिकन वाढलं. यावर वरपक्षातील मंडळींनी “सभ्यपणे जेवण वाढा” असा विरोध केला आणि किरकोळ वाद तुफान हाणामारीत बदलला.

हेही वाचा - Rahul Gandhi Swimming Video : बिहारच्या तळ्यात राहुल गांधींची जलक्रीडा! 'डुबवू नका' म्हणत युजर्सच्या कमेंटस्, राजकीय चर्चांना उधाण

चिकन फ्रायवरून तीनदा हाणामारी 

दरम्यान, हा वाद इतका वाढला की पाहुण्यांनी एकमेकांवर थाळ्या, बाटल्या आणि खुर्च्या फेकल्या. मध्यस्थी करण्यासाठी उपस्थित वडीलधाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला. थोड्या वेळाने जेवण पुन्हा सुरू झाले, पण चिकन संपल्यानंतर वाद पुन्हा पेटला. सलग तीन वेळा भांडण झाल्यानंतर पोलिसांना तातडीने बोलावावं लागलं.

हेही वाचा - Stunt For Reel : रील बनवण्याच्या नादात गमावला जीव; धावत्या रेल्वेची धडक बसल्याने तरुणाचा मृत्यू

दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप

वरपक्षाचं म्हणणं आहे की, वधूपक्षाकडून मुद्दाम पाहुण्यांना उद्धट वागणूक देण्यात आली आणि जेवणात भेदभाव केला गेला. तर वधूपक्षाचा दावा वराकडच्या लोकांनी विनाकारण वातावरण बिघडवलं, जेवण पुरेसं होतं, पण त्यांनी अति मागण्या केल्या. परिस्थिती हाताबाहेर जाताच पोलिसांनी मॅरेज हॉलमध्ये येऊन जमाव शांत केला. शेवटी, पोलीस आणि स्थानिक धर्मगुरूंच्या उपस्थितीत निकाह पार पडला, आणि वधूला निरोप देण्यात आला.


सम्बन्धित सामग्री