TRAI Bhashini AI: कॉल ड्रॉपच्या त्रासातून अखेर सुटका; ट्रायने लाँच केलं ‘हे’ खास हायटेक ॲप

या ॲपमध्ये केंद्र सरकारच्या 'भाषिणी' (BHASHINI) या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.

TRAI Bhashini AI: कॉल ड्रॉपच्या त्रासातून अखेर सुटका;  ट्रायने लाँच केलं ‘हे’ खास हायटेक ॲप

TRAI Bhashini AI : वारंवार होणारे कॉल ड्रॉप्स, संभाषणादरम्यान येणारा अडथळा आणि नेटवर्कच्या खराब दर्जाला कंटाळलेल्या लाखो मोबाईल ग्राहकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) आपल्या 'MyCall' या लोकप्रिय ॲपची पूर्णपणे नवीन आणि हायटेक आवृत्ती बाजारात आणली आहे. या ॲपमध्ये केंद्र सरकारच्या 'भाषिणी' (BHASHINI) या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला असून, यामुळे ग्राहकांना थेट स्वतःच्या भाषेत व्हॉइसद्वारे अभिप्राय देणे शक्य होणार आहे.

आता अँड्रॉइडसह आयफोनवरही उपलब्ध
ट्रायने या वेळी 'MyCall' ॲप केवळ अँड्रॉइडपुरते सीमित न ठेवता iOS (आयफोन) वापरकर्त्यांसाठीही खुले केले आहे. यामुळे देशातील बहुतांश मोबाईलधारक आता आपल्या दैनंदिन कॉलिंग अनुभवाबद्दलची अचूक माहिती थेट ट्रायपर्यंत पोहोचवू शकणार आहेत.

'भाषिणी' AI मुळे भाषेची अडचण दूर
या नव्या आवृत्तीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे 'भाषिणी' एआय प्लॅटफॉर्म! यामुळे देशातील कोणत्याही भागातील नागरिक, दुर्गम क्षेत्रातील लोक आपल्या मातृभाषेत किंवा आवडीच्या भारतीय भाषेत बोलून कॉलिंगच्या दर्जाबाबत रेटिंग किंवा अभिप्राय देऊ शकतात. यामुळे भाषेचा अडथळा पूर्णपणे संपला असून ग्राहकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ग्राहकांना मिळणारे मुख्य फायदे

तक्रार नोंदवणे सोपे: कॉल ड्रॉप किंवा खराब आवाजाबाबत काही सेकंदांत थेट फीडबॅक देता येईल.

मातृभाषेत सुविधा: इंग्रजी वा हिंदी ऐवजी स्वतःच्या भाषेत आवाज नोंदवून अभिप्राय देता येईल.

कंपन्यांवर वचक: ग्राहकांच्या प्रत्यक्ष डेटाच्या आधारे टेलिकॉम कंपन्यांच्या सेवेचा दर्जा मोजला जाईल.

नेटवर्क सुधारणेला गती: ग्राहकांच्या अभिप्रायामुळे खराब नेटवर्क असलेल्या भागांची तातडीने ओळख पटवून तेथे सुधारणा करणे सोपे होईल.

हेही वाचा – Chhava Ride App: मोठी बातमी! ST, ऑटो, टॅक्सी आणि ई-बसचं बुकिंग आता एकाच 'छावा राईड' ॲपवर; प्रवास होणार आणखी स्मार्ट

ट्रायचे अध्यक्ष काय म्हणाले?
ट्रायचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांनी स्पष्ट केले की, नवीन 'MyCall' ॲप आणण्यामागचा मुख्य उद्देश ग्राहकांचा सहभाग वाढवणे हा आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि युझर्सचा थेट अभिप्राय या दोन्ही गोष्टींचा योग्य ताळमेळ साधून देशातील मोबाईल सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी ट्राय कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number