Gold Price Prediction: गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या बाजारात मोठी हालचाल सुरू आहे. एकेकाळी आकाशाला भिडणारे दर आता सातत्याने खाली येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, फक्त दोन आठवड्यांच्या कालावधीत सोन्याच्या दरात तब्बल 13 हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करायचं का थांबावं, हा प्रश्न सर्वसामान्य ग्राहक आणि गुंतवणूकदारांना पडला आहे.
सोन्याच्या दरात मोठी घसरण
ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापासून सोन्याचा भाव हळूहळू कमी होऊ लागला. 17 ऑक्टोबरला प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर सुमारे 1 लाख 30 हजार रुपयांपर्यंत गेला होता. मात्र, काही दिवसांतच हा दर 1 लाख 18 हजारांपर्यंत खाली आला. म्हणजेच केवळ 13 दिवसांत सुमारे 13 हजार रुपयांची घट नोंदली गेली आहे.
हेही वाचा: Indian Rupee Updates: चलन बाजारात रुपयाची सौम्य घसरण; रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्याचा प्रयत्न
लग्नसराईत ग्राहकांसाठी दिलासा
भारतात येत्या काही आठवड्यांत लग्नाचा हंगाम सुरू होणार आहे. या काळात सोन्याची मागणी परंपरेने वाढते. त्यामुळे दर घसरल्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अनेक ज्वेलर्सच्या मते, सध्या सोनं खरेदीसाठी चांगला काळ असू शकतो कारण लग्नाचा सीझन सुरु झाल्यावर दर पुन्हा वाढू शकतात.
एक्सपर्ट्स काय म्हणतात?
तज्ज्ञांच्या मते, सध्या सोन्याच्या दरात तात्पुरती घसरण दिसत असली तरी दीर्घकाळात पुन्हा तेजी येण्याची शक्यता आहे. जागतिक अर्थव्यवस्था, डॉलरचा दर आणि व्याजदरातील बदल याचा सोन्याच्या किमतींवर थेट परिणाम होत असतो.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, पुढील एका वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 5,000 डॉलरपर्यंत जाऊ शकतो. देशांतर्गत बाजारात तो 1 लाख 50 हजारांच्या पुढे जाईल, असा अंदाज काही अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा: What is Family Pension: कुटुंब पेन्शन म्हणजे काय? जर दोन पत्नी असल्यास पैसे कोणाला मिळतील? जाणून घ्या काय आहे नियम
वायदा बाजारातील हालचाल
पेपरस्टोन ग्रुपचे संशोधन प्रमुख क्रिस वेस्टन यांच्या मते, सोन्याच्या किमतींमध्ये अस्थिरता कायम राहणार आहे. पुढील महिन्यात दर 3900 डॉलर प्रति औंसच्या आसपास स्थिर राहिले, तर बुलिश ट्रेंड पुन्हा दिसू शकतो. सध्या गुंतवणूकदारांकडून वायदा बाजारात खरेदी वाढताना दिसत आहे, त्यामुळे किंमतींमध्ये पुढील काही दिवसांत चढउतार होण्याची शक्यता आहे.
गुंतवणूकदारांसाठी सल्ला
एक्सपर्ट्स सांगतात की, सध्या सोन्याचे भाव कमी असल्याने थोड्या प्रमाणात खरेदी सुरू करणे फायद्याचे ठरू शकते. मात्र, मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी पुढील काही आठवड्यांचा दराचा कल पाहणे महत्त्वाचे आहे.
सोनं आणि चांदी या दोन्ही धातूंमध्ये सध्या घसरणीचा कल असला तरी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला ठरू शकतो. लग्नाचा हंगाम जवळ येत असताना पुन्हा दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ज्यांना सोन्यात गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी ही ‘गोल्डन चान्स’ ठरू शकते!