Gold Silver Rate Today: सामान्यांना दिलासा! सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण, चांदीही स्वस्त; खरेदीपूर्वी पाहा आजचे दर

सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली असून चांदीचे दरही कमी झाले आहेत.

Gold Silver Rate Today: सामान्यांना दिलासा! सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण, चांदीही स्वस्त; खरेदीपूर्वी पाहा आजचे दर

नवी दिल्ली: "सोनं" हा भारतीयांच्या केवळ जिव्हाळ्याचा विषय नाही, तर ती पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. मात्र, सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या राजकीय आणि आर्थिक घडामोडींमुळे सराफा बाजाराला जणू अस्थिरतेचे ग्रहण लागले आहे. क्षणात दर गगनाला भिडतात, तर क्षणात नीचांकी पातळी गाठतात, त्यामुळे सोनं घ्यायच्या नावानेच सर्वसामान्यांना धडकी भरते. अशातच, ग्राहकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली असून, सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात लक्षणीय घसरण नोंदवण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय अस्थिरता, विशेषतः अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आणि डॉलरच्या मूल्यामध्ये होणारे चढ-उतार यांचा थेट परिणाम सोन्याच्या भावावर होत असतो. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम आशियातील तणाव काहीसा निवळल्याचे चित्र आहे. या बदलत्या जागतिक परिस्थितीमुळे आणि अमेरिकन डॉलर अधिक मजबूत झाल्यामुळे, युद्धाच्या सावटाखाली 'सुरक्षित मालमत्ता' म्हणून सोन्याकडे पाहणाऱ्या गुंतवणूकदारांचा ओढा काहीसा कमी झाला आहे. याच कारणामुळे जागतिक बाजारात सोन्याची चमक सध्या फिकी पडल्याचे पाहायला मिळत आहे.

आज (5 मे 2026) देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. गेल्या दोन दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम तब्बल 1320 रुपयांची, तर 22 कॅरेट सोन्यात 1210 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. आज राजधानी दिल्लीत 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर अनुक्रमे 10 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,49,610 रुपये, तर 22 कॅरेटचा भाव 1,37,140 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे. चेन्नईत मात्र सोन्याचे दर सर्वाधिक म्हणजे 24 कॅरेटसाठी 1,52,720 रुपयांवर पोहोचले आहेत.

हेही वाचा: Maharashtra Weather Update: राज्यात एका बाजूला सूर्य आग ओकतोय, तर दुसरीकडे अवकाळीची स्थिती! विदर्भाला 'येलो अलर्ट', जाणून घ्या तुमच्या शहराची स्थिती…

सोन्याबरोबरच चांदीच्या दरानेही ग्राहकांना आज सुखद धक्का दिला आहे. सलग दोन दिवस स्थिर राहिल्यानंतर आज चांदीच्या दरात घट नोंदवली गेली. याआधीच्या दोन दिवसांत चांदी तब्बल 1500 रुपये प्रति किलोने महागली होती. मात्र, आज दिल्लीत चांदीच्या दरात 100 रुपयांची घसरण झाली असून, ती 2,64,900 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. मुंबई आणि कोलकात्यामध्येही चांदी याच दराने उपलब्ध आहे. मात्र, दक्षिणेकडील चेन्नई शहरात चांदीचे दर देशात सर्वाधिक असून तिथे एक किलो चांदीसाठी 2,69,900 रुपये मोजावे लागत आहेत.

भविष्यात सोन्याचे दर काय वळण घेतील, याबाबत महत्त्वाचे मत नोंदवले आहे. जागतिक बाजारात मजबूत होत चाललेला डॉलर आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे सोन्यावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. जेव्हा कच्च्या तेलाचे दर वाढतात, तेव्हा आपोआपच डॉलरची मागणी वाढते, ज्याचा थेट आणि नकारात्मक परिणाम सोन्याच्या किमतींवर होतो. याशिवाय, अमेरिकेत व्याजदर कपातीची शक्यताही सध्या धूसर असल्याने नजीकच्या काळात सोन्यावर असाच दबाव राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी बाजारातील या बारकाव्यांवर लक्ष ठेवूनच खरेदीचा निर्णय घेणे शहाणपणाचे ठरेल. 

हेही वाचा: Petrol Diesel Rate Today: भारतीय वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी; भारतात पेट्रोल-डिझेल स्थिर, पाहा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number