Gold Rate Today : ग्राहकांसाठी खूशखबर! सोन्याच्या दरात 10 ग्रॅममागे तब्बल 2000 रुपयांची घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून सोन्याचे दर झपाट्याने वाढले असून आता सर्वसामान्यांना सोने खरेदी करणेही कठीण झाले आहे. मात्र सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांसाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे. आज, बुधवारी नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. सोन्याचे दर १० ग्रॅममागे २००० रुपयांनी घसरले असल्याचे Bullion.co.in च्या आकडेवारीनुसार समजते. भारतात सोन्याचा भाव प्रति […]

Gold Rate Today : ग्राहकांसाठी खूशखबर! सोन्याच्या दरात 10 ग्रॅममागे तब्बल 2000 रुपयांची घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून सोन्याचे दर झपाट्याने वाढले असून आता सर्वसामान्यांना सोने खरेदी करणेही कठीण झाले आहे. मात्र सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांसाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे. आज, बुधवारी नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. सोन्याचे दर १० ग्रॅममागे २००० रुपयांनी घसरले असल्याचे Bullion.co.in च्या आकडेवारीनुसार समजते. भारतात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५२,१६० रुपये होता, तर चांदीचा भाव प्रति किलो २,३४,७८० रुपये होता. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात सुमारे ४.५ टक्क्यांची घसरण झाली असली, तरीही हे दर एका वर्षापूर्वीच्या तुलनेत ४३.३ टक्क्यांनी अधिक आहेत. मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,३९,२२३ रुपये होता. तसेच दिल्लीत १,३८,९८५ रुपये, चेन्नईमध्ये १,३९,६२७ रुपये, कोलकातामध्ये १,३९,०४० रुपये, बंगळुरूमध्ये १,३९,३३३ रुपये आणि हैदराबादमध्ये १,३९,४४३ रुपये इतका होता.

शहरांनुसार सोन्याचे दर

मुंबई: १,५१,८८० रुपये प्रति १० ग्रॅम
दिल्ली: १,५१,६२० रुपये प्रति १० ग्रॅम
चेन्नई: १,५२,३२० रुपये प्रति १० ग्रॅम
कोलकाता: १,५१,६८० रुपये प्रति १० ग्रॅम
बेंगळुरू: १,५२,००० रुपये प्रति १० ग्रॅम
हैदराबाद: १,५२,१२० रुपये प्रति १० ग्रॅम

हेही वाचा : Ravindra Chavan: आंदोलन फसलं, आता प्रदेशाध्यक्षांचा दणका! कृष्णराज महाडिकांना रवींद्र चव्हाणांनी सुनावलं; ‘काल आलेला पोरगा…’

आजचे चांदीचे दर

बुधवारी, 'सिल्व्हर ९९९ फाइन'चा दर २,३४,७८० रुपये प्रति किलो होता, तर 'सिल्व्हर ९२५ स्टर्लिंग'चा दर २,१७,१७२ रुपये प्रति किलो होता. गेल्या आठवड्यात 'सिल्व्हर ९९९ फाइन'च्या दरात सुमारे २.३ टक्क्यांची घट झाली आहे. मात्र, गेल्या वर्षभरात या धातूच्या दरात सुमारे ८९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

शहरांनुसार '९९९ फाइन' (शुद्ध) चांदीचे दर 

मुंबई: २,३४,३५० रुपये प्रति किलो
दिल्ली: २,३३,९५० रुपये प्रति किलो
चेन्नई: २,३५,०३० रुपये प्रति किलो
कोलकाता: २,३४,०४० रुपये प्रति किलो
बेंगळुरू: २,३४,५४० रुपये प्रति किलो
हैदराबाद: २,३४,७२० रुपये प्रति किलो

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number