Gold Silver Rate Today: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; सोनं झालं स्वस्त, आजचे दर पाहा

मध्यपूर्वेतील तणाव काहीसा कमी झाल्याने जागतिक आणि देशांतर्गत सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे.

Gold Silver Rate Today: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; सोनं झालं स्वस्त, आजचे दर पाहा

मुंबई: सध्या सराफा बाजारातील परिस्थिती पाहता, गुंतवणूकदारांच्या गळ्यातील ताईत असलेले हेच सोने आता निस्तेज होऊ लागले आहे. सलग दहाव्या दिवशी सराफा बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली असून, सोने-चांदीच्या दरांना अक्षरशः गळती लागली आहे. मध्यपूर्वेत उफाळून आलेला अमेरिका-इराण युद्धजन्य तणाव आता काहीसा निवळताना दिसत असल्याचा हा थेट परिणाम आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळलेल्या गुंतवणूकदारांनी आता 'थांबा आणि वाट पाहा' अशी सावध भूमिका घेतल्याने, मंगळवारी 24 मार्च 2026 रोजी देशांतर्गत आणि जागतिक बाजारात मौल्यवान धातूंचे दर आपटले आहेत. सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही बाब दिलासा देणारी आहे. 

जागतिक सराफा बाजारातील कल, चलनांमधील चढ-उतार आणि देशांतर्गत मागणीची सद्यस्थिती यामुळे भारतीय बाजारात सोने-चांदीचे दर घसरणपंथीला लागले आहेत. मंगळवारी भारतीय कमोडिटी बाजारात एप्रिल महिन्यासाठीचा सोन्याचा वायदा 1.38 टक्क्यांनी म्हणजेच तब्बल 1,925 रुपयांनी खाली आला.

यामुळे 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,37,558 रुपयांवर घसरली आहे. दुसरीकडे, चांदीची अवस्था याहूनही बिकट असून मे महिन्याचा चांदीचा वायदा 2.84 टक्क्यांनी (6,388 रुपये) कोसळून 2,18,779 रुपयांवर आला आहे. प्रत्यक्ष बाजारात दागिन्यांची मागणी स्थिर असली तरी, गुंतवणूकदारांचा निरुत्साह या घसरणीला कारणीभूत ठरत आहे.

हेही वाचा: Property Card Portal: प्रॉपर्टी कार्डचा ‘कायापालट’; मालमत्ता व्यवहारांतील ‘लाल फित’ आता इतिहासजमा, फेरफार प्रक्रियेसह महसूल विभागातील विविध कामे करणे झाले सोपे

केवळ देशांतर्गत नव्हे, तर जागतिक पातळीवरही हीच स्थिती आहे. मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याची चिन्हे दिसताच जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये तीन टक्क्यांपेक्षा जास्त घट नोंदवली गेली. आशियाई व्यापाराच्या सत्रात 'कॉमेक्स'वर सोन्याची किंमत 1.51 टक्क्यांनी घसरून प्रति औंस 4,370 डॉलरवर आली आहे. तर, चांदीची किंमत 3.30 टक्क्यांच्या घसरणीसह 67 डॉलर प्रति औंस या पातळीवर स्थिरावली आहे. भू-राजकीय तणावाच्या काळात सोन्यामध्ये आलेली अनपेक्षित वाढ आता ओसरू लागली असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

या घसरणीमागे केवळ युद्धजन्य परिस्थिती निवळणे हे एकच कारण नाही, तर जागतिक अर्थकारणातील अनेक गुंतागुंतीचे धागेदोरे याला जोडलेले आहेत. सोने बाजार तज्ज्ञांच्या मते, मध्यपूर्वेतील तेल पायाभूत सुविधांच्या नुकसानीमुळे जगभरात महागाईचा भडका उडण्याची भीती अद्याप कायम आहे. याच महागाईला लगाम घालण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक 'फेडरल रिझर्व्ह' नजीकच्या काळात व्याजदरात कोणतीही कपात करणार नाही आणि ते स्थिरच ठेवेल, अशी बाजाराला अपेक्षा आहे. व्याजदर चढे राहिल्यास सोन्यासारख्या व्याजरहित गुंतवणुकीचे आकर्षण साहजिकच कमी होते.

याशिवाय, बाजारात सध्या एका नव्या शक्यतेने खळबळ उडवून दिली आहे. वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँका त्यांच्याकडील सोन्याच्या साठ्याची विक्री करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाजारात आधीच सोन्याचा अतिरिक्त पुरवठा असताना, मध्यवर्ती बँकांनी विक्रीचा सपाटा लावल्यास मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडेल. परिणामी, आगामी काळात सोन्याच्या किमतीवर आणखी दबाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकंदरीतच, जागतिक राजकारण आणि अर्थकारणाच्या या दुहेरी कोंडीत अडकलेले सोने आता त्याची गमावलेली चमक कधी परत मिळवते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा: Stock Market Today: शेअर बाजार सुस्साट ! सेन्सेक्स 1000 पेक्षा जास्त अंकांनी उसळला, निफ्टीची 23 हजारांच्या दिशेने कूच, ट्रम्पची ती घोषणा पथ्यावरच पडली 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number