Maharashtra Government On MPSC Student : MPSC उमेदवारांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; परीक्षेत अंतिम निवड न झालेल्यांना आता थेट….

एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांच्या रोजगारासाठी फडणवीस सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Maharashtra Government On MPSC Student : MPSC उमेदवारांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; परीक्षेत अंतिम निवड न झालेल्यांना आता थेट….

एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांच्या रोजगारासाठी फडणवीस सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप आमदार विक्रम सिंह पाचपुते यांनी केलेल्या मागणीनुसार आता युपीएससीच्या प्रतिभा सेतूच्या धर्तीवर राज्यात निपुण सेतू पोर्टल सुरु होणार आहे.

भाजप आमदार विक्रम सिंह पाचपुते यांनी केलेल्या या मागणीची दखल घेत सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय घेतला आहे. भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी जुलै 2025 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने देखील प्रतिभा सेतू योजना सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते.

हेही वाचा- Air India Loss: एअर इंडियाला 20,000 कोटींचा तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे मागितली मदत

अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांची यादी सार्वजनिक व खासगी संस्थांना पाठवणार यामुळे या विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये, म्हणजेच खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रात नोकरी मिळणे अधिक सोपे होईल तसेच महाजॉब्स पोर्टल अंतर्गत निपुण सेतू उपक्रम सुरु करणार आहेत.

त्यासाठी एमपीएससी पुर्वी 53 संवर्गासाठी परीक्षा घेत होती, आता 103 संवर्ग तयार करण्यात आले आहेत. राज्यातील एमपीएससी परीक्षा अधिक पारदर्शक आणि गतीमान होण्यासाठी, विद्यार्थ्यांनी कुठल्याही अमिषाला बळी न पडता केवळ अभ्यास आणि परीक्षेवरच लक्ष केंद्रीत कराव यासाठी राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number