8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी 3 मोठ्या भेटवस्तू मिळण्याची शक्यता

मोदी सरकारने आधीच 22 सप्टेंबरपासून नवीन GST सुधारणा लागू करून 370 वस्तू स्वस्त केल्या असून, आता कर्मचाऱ्यांसाठी आणखी मोठा दिलासा मिळू शकतो.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी 3 मोठ्या भेटवस्तू मिळण्याची शक्यता

8th Pay Commission: दिवाळीपूर्वी केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना 3 मोठ्या भेटवस्तू देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये 8व्या वेतन आयोगाची घोषणा, महागाई भत्ता (DA) वाढ आणि दिवाळी बोनस यांचा समावेश आहे. मोदी सरकारने आधीच 22 सप्टेंबरपासून नवीन GST सुधारणा लागू करून 370 वस्तू स्वस्त केल्या असून, आता कर्मचाऱ्यांसाठी आणखी मोठा दिलासा मिळू शकतो.

आठवा वेतन आयोग

सरकार लवकरच आठव्या वेतन आयोगाची स्थापना करू शकते. हा आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर 2025 पर्यंत संदर्भ अटी (TOR) जाहीर करून अधिकृतपणे आयोगाची घोषणा केली जाऊ शकते. याअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या वेतनरचनेत मोठी वाढ होईल. 

हेही वाचा – Bonus for Railway Employees : रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात; 78 दिवसांच्या पगाराइतका मिळणार बोनस

महागाई भत्ता (DA) वाढ

सध्या कर्मचाऱ्यांना 55 टक्के DA मिळत आहे. AICPI च्या आकडेवारीनुसार, जुलै 2025 पासून DA 58 टक्के पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वी सरकार 3 टक्के वाढ जाहीर करू शकते.

हेही वाचा – PM Kisan Scheme : शेतकऱ्यांना दिलासा! पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची रक्कम 'या' दिवशी जमा होईल

दिवाळी बोनस

दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील सरकार नॉन-राजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी उत्पादकता लिंक्ड बोनस (PLB) किंवा अॅड-हॉक बोनस जाहीर करू शकते. हा बोनस दिवाळीपूर्वी जाहीर होण्याची अपेक्षा आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number