Farm Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी खूशखबर! ‘या’ तारखेपूर्वी खात्यात थेट जमा होणार कर्जमाफीचे पैसे

नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात सहकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत अंमलबजावणीला गती दिली आहे.<br/>

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी खूशखबर! ‘या’ तारखेपूर्वी खात्यात थेट जमा होणार कर्जमाफीचे पैसे

Farm Loan Waiver: राज्यभरातील लाखो शेतकरी ज्या क्षणाची चातकासारखी वाट पाहत होते, तो कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. आगामी 30 जुलैच्या आत पात्र असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमुक्तीची रक्कम थेट पाठवण्याची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात सहकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत अंमलबजावणीला गती दिली आहे.

30 जुलै पूर्वी येणार कर्जमाफीची पहिली यादी; तांत्रिक अडथळे दूर
कर्जमुक्तीच्या अंमलबजावणीबाबत अधिक माहिती देताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या शुभमुहूर्तावर पात्र लाभार्थ्यांची पहिली अधिकृत यादी जाहीर करण्याचे नियोजन सरकारने आखले आहे. केंद्र सरकारकडून प्राप्त होणारा प्राप्तीकर परताव्याचा (Income Tax Return) आवश्यक डेटा आता उपलब्ध झाला असल्याने सर्व तांत्रिक अडचणी संपुष्टात आल्या आहेत. परिणामी, 30 जुलैच्या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल.

बोगस बियाणे विक्रेत्यांवर कठोर कारवाई; 81 कंपन्यांवर गुन्हे दाखल
तसेच, यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनच्या कमी उगवणक्षमतेमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कृषी विभाग ॲक्शन मोडमध्ये आला आहे. विशेषतः विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांतून बियाण्यांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल झाल्या होत्या.

हेही वाचा – Devendra Fadnavis: 'पोळी भाजणारे राजकीय पक्ष अन् परीक्षेशी संबंध नसलेले लोक…'; दिल्लीतील घडामोडींवर मुख्यमंत्री फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

कृषी विभागाने प्राप्त झालेल्या एकूण 11,584 तक्रारींपैकी 8,192 ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन शेतांची पाहणी केली. या तपासणीत बियाण्यांचे 763 नमुने नापास झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी कडक पावले उचलत राज्यभरात एकूण 81 बियाणे उत्पादक कंपन्यांवर थेट गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहेत. निकृष्ट दर्जाचे बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कोणत्याही घटकाला पाठीशी घातले जाणार नाही, असा सज्जड इशारा कृषीमंत्र्यांनी दिला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number