CERT-In Warning: देशात अँड्रॉइड स्मार्टफोनचा वापर करणाऱ्या वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडिया, पेमेंट्स, ऑफिस वर्क, ई-मेल्स, बँकिंग सर्व काही आता हातातल्या या एका डिव्हाइसवर अवलंबून आहे. अशातच सरकारच्या भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथकाने (CERT-In) एक महत्त्वाची सूचना जारी करत सर्व Android युजर्सना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. ही चेतावणी साधी नाही, तर ‘हाय-रिस्क सिक्युरिटी’ लेवलवरची आहे.
CERT-In च्या मते, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीममध्ये काही गंभीर सुरक्षा त्रुटी आढळल्या आहेत. या बग्समुळे हॅकर्सना युजरच्या फोनमध्ये अनधिकृत प्रवेश मिळण्याची मोठी शक्यता आहे. म्हणजे सहज भाषेत सांगायचं तर हॅकर तुमचा फोन दूरून नियंत्रित करू शकतो, डेटा चोरी करू शकतो, आणि फोन सिस्टीम क्रॅश देखील करू शकतो.
कोणत्या Android आवृत्त्यांवर जास्त धोका?
ज्यांनी आपल्या फोनमध्ये अँड्रॉइड 13, अँड्रॉइड 14, अँड्रॉइड 15 किंवा Android 16 व्हर्जन वापरले आहे, त्या सर्वांवर हा धोका अधिक गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. Qualcomm, MediaTek, UNISOC, NVIDIA अशा चिपसेट प्लॅटफॉर्मवर देखील काही मोठ्या कमतरता ओळखल्या गेल्या आहेत. त्यामुळे फोन किती महाग आहे किंवा कोणते कंपनीचे डिव्हाइस आहे यावर सुरक्षितता ठरू शकत नाही. या Android आवृत्त्यांवर डिव्हाइस चालत आहे का हेच महत्त्वाचे.
युजरने काय करावे?
चांगली बाब म्हणजे Google ने या त्रुटींवर काम करत सिक्युरिटी अपडेट जारी केले आहे. त्यामुळे एक साधा उपाय फोन तात्काळ अपडेट करणे.
फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन Software update किंवा System update असा पर्याय तपासा. Update available दिसत असेल तर लगेच install करा. तुमच्या फोनमध्ये Automatic update फीचर असेल तर तेही ऑन करणे फायदेशीर.
अपडेट का महत्त्वाचे?
-
सिक्युरिटी बग्स दूर होतात
-
सायबर अटॅकचा धोका कमी होतो
-
डिव्हाइसचे परफॉर्मन्स सुधारते
-
नवीन फीचर्स मिळतात
अनेक लोक “नंतर करतो” म्हणत अपडेट्स पुढे ढकलतात. पण सायबर-हल्ले आता बटणाच्या एका क्लिकवर होऊ शकतात. म्हणून अचानक फोनमध्ये विचित्र पॉप-अप्स, अनोळखी फाईल्स, अॅप्स स्वतः इंस्टॉल होणे – असे काहीही दिसल्यास दुर्लक्ष करू नका.
आजच्या काळात बेसिक डिजिटल हायजिन
-
अनोळखी लिंकवर क्लिक न करणे
-
क्रॅक्ड/Mod apps टाळणे
-
फोन व अॅप्स दोन्ही अपडेट ठेवणे
-
Strong पासवर्ड व 2FA वापरणे
CERT-In सारख्या संस्था वेळोवेळी इशारे देतात; पण त्याचा फायदा युजरनेच घ्यायचा असतो.