Land Mutation Cancellation: मंजूर झालेला जमिनीचा फेरफार रद्द कसा करावा? जाणून घ्या नियम, मुदत आणि प्रक्रिया

वारसा हक्काच्या नोंदीमध्ये अनेकदा चुकीचा 'फेरफार' (Mutation) मंजूर केला जातो. अशा वेळी घाबरून न जाता, महसूल कायद्यातील तरतुदींनुसार तो रद्द करून घेता येतो.

Land Mutation Cancellation: मंजूर झालेला जमिनीचा फेरफार रद्द कसा करावा? जाणून घ्या नियम, मुदत आणि प्रक्रिया

Land Mutation Cancellation:  जमिनीच्या व्यवहारात किंवा वारसा हक्काच्या नोंदीमध्ये अनेकदा चुकीचा 'फेरफार' (Mutation) मंजूर केला जातो. अशा वेळी घाबरून न जाता, महसूल कायद्यातील तरतुदींनुसार तो रद्द करून घेता येतो. 'महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966' अन्वये ही दुरुस्ती कशी केली जाते, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:

1. अपील कुठे आणि कोणत्या कलमांतर्गत करावे?
जर एखादा फेरफार चुकीच्या पद्धतीने किंवा पुराव्याअभावी मंजूर झाला असेल, तर तो थेट तलाठी किंवा मंडळ अधिकारी रद्द करू शकत नाहीत. त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 247 नुसार, संबंधित तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी (SDO) किंवा प्रांताधिकाऱ्यांकडे दाद मागावी लागते.

2. फेरफार रद्द करण्याची टप्प्याटप्प्याने प्रक्रिया
प्रमाणित प्रत मिळवणे: सर्वात आधी ज्या फेरफार क्रमांकावर तुमचा आक्षेप आहे, त्याची प्रमाणित प्रत तलाठी कार्यालयातून प्राप्त करावी. यामुळे नेमकी चूक कुठे झाली आहे, हे स्पष्ट होईल.
अपील अर्ज दाखल करणे: चुकीचा फेरफार का रद्द करावा, याची सविस्तर कारणे नमूद करून SDO यांच्याकडे 'अपिल अर्ज' सादर करावा लागतो.
पुरावे जोडणे: अर्जासोबत 7/12 उतारा, 8-A, जुने फेरफार, मृत्यू दाखला (गरज असल्यास) आणि ज्या कागदपत्रांच्या आधारे तुम्ही फेरफार चुकीचा ठरवत आहात, ते सर्व पुरावे जोडावेत.

3. सुनावणी आणि अंतिम निकाल
अर्ज दाखल झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी दोन्ही पक्षांना (अर्जदार आणि ज्याच्या नावे फेरफार झाला आहे तो) आपली बाजू मांडण्यासाठी नोटीस पाठवतात. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यावर आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर, जर फेरफार खरोखरच चुकीचा आढळला, तर तो रद्द करण्याचे किंवा सुधारण्याचे आदेश दिले जातात.

हेही वाचा – Onion Price Crash: बळीराजाच्या डोळ्यात कांद्याने आणले पाणी; मातीमोल दरामुळे शेतकरी हवालदिल

4. आदेशाची अंमलबजावणी
SDO कार्यालयाकडून फेरफार रद्द करण्याचा आदेश मिळाल्यावर, तो आदेश घेऊन तलाठी कार्यालयात जावे लागते. या आदेशाच्या आधारे तलाठी जुनी नोंद रद्द करून नवीन अधिकृत फेरफार नोंदवतात, ज्यामुळे जमिनीच्या रेकॉर्डमध्ये सुधारणा होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number