Loan Fraud : तुमच्या नावावर दुसरंच कोणी कर्ज घेत आहे का? सिबिल स्कोरला लावा ‘डिजिटल कुलूप’; क्रेडिट फ्रीजमुळे आर्थिक फसवणूक थांबणार

क्रेडिट फ्रीज म्हणजे तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर एक प्रकारे डिजिटल टाळे लावणे होय. एकदा का तुम्ही तुमचा रिपोर्ट फ्रीज केला की, कोणी तुमच्या नावावर कर्ज घेऊ शकणार नाही. कसे, ते जाणून घ्या..

Loan Fraud : तुमच्या नावावर दुसरंच कोणी कर्ज घेत आहे का? सिबिल स्कोरला लावा ‘डिजिटल कुलूप’; क्रेडिट फ्रीजमुळे आर्थिक फसवणूक थांबणार

Online Fraud Protection Tips : आजच्या डिजिटल युगात बँकिंग व्यवहार जितके सोपे झाले आहेत, तितकाच आर्थिक फसवणुकीचा धोकाही वाढला आहे. अनेकदा पॅन कार्डचा गैरवापर करून कोणाच्याही नावावर बनावट कर्ज घेतले जाते. काही लहान-मोठी कर्जे तुमच्या नकळत लोकांनी घेतली तर याचा थेट परिणाम त्या व्यक्तीच्या सिबिल (CIBIL) स्कोरवर होतो. जेव्हा हप्त्यांची परतफेड होत नाही, तेव्हा स्कोर खालावतो आणि भविष्यात स्वतःला कर्ज घेताना अडचणी येतात. अशा सायबर गुन्हेगारांपासून वाचण्यासाठी 'क्रेडिट फ्रीज' हे एक प्रभावी शस्त्र ठरू शकते.

क्रेडिट फ्रीज म्हणजे नक्की काय?
क्रेडिट फ्रीज म्हणजे तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर एक प्रकारे डिजिटल टाळे लावणे होय. एकदा का तुम्ही तुमचा रिपोर्ट फ्रीज केला की, कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था तुमच्या परवानगीशिवाय तुमचा सिबिल स्कोर किंवा क्रेडिट हिस्ट्री पाहू शकणार नाही. कर्ज मंजूर करण्यापूर्वी बँका क्रेडिट रिपोर्ट तपासणे अनिवार्य असते; मात्र रिपोर्ट फ्रीज असल्याने फसवणूक करणाऱ्यांना तुमच्या नावावर कर्ज घेणे किंवा क्रेडिट कार्ड मिळवणे अशक्य होते.

हेही वाचा – Cloud Mythos AI: आता ओटीपी नाही तर 'मायथॉस'मुळे तुमचं बॅंक अकाऊंट होऊ शकतं खाली, वित्तमंत्र्यांनी तातडीने बोलावली बैठक

प्रक्रिया कशी करावी?
भारतात प्रामुख्याने TransUnion CIBIL, Equifax, Experian आणि CRIF High Mark या 4 प्रमुख क्रेडिट ब्युरो संस्था आहेत. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रक्रिया फॉलो करा:
नोंदणी: संबंधित ब्युरोच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुमचे खाते तयार करा.
पर्याय निवडा: लॉगिन केल्यानंतर 'Credit Freeze' किंवा 'Control' या विभागात जा.
रिक्वेस्ट पाठवा: दिलेल्या सूचनांचे पालन करून फ्रीज करण्याची विनंती सबमिट करा.
पिन (PIN) जपून ठेवा: प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक युनिक पिन किंवा पासवर्ड मिळेल. भविष्यात रिपोर्ट 'अनफ्रीज' करण्यासाठी या पिनची आवश्यकता भासते.

महत्त्वाच्या टिप्स आणि खबरदारी
स्वतःच्या कर्जावर परिणाम – लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमची क्रेडिट रिपोर्ट फ्रीज आहे, तोपर्यंत तुम्ही स्वतःदेखील नवीन कर्जासाठी अर्ज करू शकणार नाही. त्यासाठी आधी रिपोर्ट अनफ्रीज करावा लागेल.
तात्पुरते अनफ्रीज – जर तुम्हाला गृहकर्ज किंवा वाहन कर्ज घ्यायचे असेल, तर काही काळासाठी रिपोर्ट अनफ्रीज करा आणि काम झाल्यावर पुन्हा लॉक करा.
नियमित देखरेख – जरी रिपोर्ट फ्रीज केला असला, तरी दर 3 ते 6 महिन्यांनी आपला क्रेडिट स्कोर तपासत राहावा, जेणेकरून कोणत्याही संशयास्पद हालचालीची त्वरित माहिती मिळेल.

हेही वाचा – Atal Pension Yojana: अटल पेन्शन योजनेची मर्यादा दुप्पट होणार; 5 हजारांऐवजी थेट 10 हजार मिळणार?, अर्थ मंत्रालयात हालचालींना वेग

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number