Viral Video: बापरे! रोबोटने 70 वर्षीय वृद्ध महिलेसोबत केलं असं काही की पोलिसांनी त्याला केली अटक; व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

रोबोटमुळे घडलेली घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Viral Video:  बापरे! रोबोटने 70 वर्षीय वृद्ध महिलेसोबत केलं असं काही की पोलिसांनी त्याला केली अटक; व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

Viral Video: चीनमधील मकाऊ येथे घडलेल्या एका अनोख्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक ह्युमनॉइड रोबोट आणि एका वृद्ध महिलेतील प्रसंग पाहायला मिळतो. सुरुवातीला या घटनेला ‘रोबोटकडून छेडछाड’ किंवा ‘रोबोटला अटक’ अशा स्वरूपात रंगवले गेले, मात्र प्रत्यक्षात या घटनेमागील सत्य वेगळेच असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 70 वर्षीय महिला रस्त्याच्या कडेला उभी राहून मोबाईल फोन वापरत होती. त्याच वेळी तिच्या मागे एक ह्युमनॉइड रोबोट उभा होता. अचानक मागे वळल्यानंतर रोबोट दिसल्याने ती महिला घाबरली आणि संतापाच्या भरात त्याच्याशी बोलताना दिसली. हा प्रसंग तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि सोशल मीडियावर शेअर केला.

व्हिडिओमध्ये महिला रोबोटशी वाद घालताना दिसते, तर काही वेळाने पोलिस घटनास्थळी दाखल होतात. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत रोबोटला तेथून हटवले. याच दृश्यांमुळे अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया देत ‘पोलिसांनी रोबोटला अटक केली’ असा दावा केला. त्यामुळे हा व्हिडिओ आणखी व्हायरल झाला.

या घटनेत महिलेचा कोणताही गंभीर अपघात किंवा दुखापत झालेली नसली, तरी खबरदारी म्हणून तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला घरी सोडले. विशेष म्हणजे, या प्रकरणात महिलेने कोणतीही औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही.

पोलिसांनी या घटनेबाबत स्पष्टता दिली आहे. संबंधित रोबोट हा एका शिक्षण केंद्राचा असून जनजागृती आणि प्रात्यक्षिकांसाठी त्याचा वापर केला जात होता. तो पूर्णपणे प्रोग्राम केलेल्या सूचनांवर आणि रिमोट मॉनिटरिंगद्वारे चालत होता. त्यामुळे या घटनेत कोणताही हेतुपुरस्सर गैरप्रकार नव्हता, असे पोलिसांनी सांगितले.

सदर रोबोट हा चिनी कंपनीने विकसित केलेला आधुनिक ह्युमनॉइड मॉडेल असल्याची माहिती समोर आली आहे. या रोबोटमध्ये चालणे, संतुलन राखणे आणि आसपासच्या वातावरणाची ओळख ठेवणे यांसारखी अत्याधुनिक वैशिष्ट्ये आहेत. मात्र, सार्वजनिक ठिकाणी अशा तंत्रज्ञानाचा वापर करताना अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

घटनेनंतर संबंधित संस्थेनेही महिलेची माफी मागितली असून भविष्यात अशा प्रकारच्या गैरसोयी टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, पोलिसांनी रोबोट त्याच्या ऑपरेटरकडे परत दिला आहे.

 ही घटना गंभीर नसली तरी आधुनिक तंत्रज्ञान आणि सामान्य नागरिक यांच्यातील वाढत्या संपर्कामुळे उद्भवणाऱ्या नव्या प्रश्नांकडे लक्ष वेधणारी ठरली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number