Flight Cancellation Refund: शेवटच्या क्षणी तिकीट रद्द केल्यास आता मिळणार 80 टक्के परतावा; सरकार लागू करणार ‘हा’ नियम

केंद्र सरकार तिकिटांमध्ये इनबिल्ट ट्रॅव्हल इन्शुरन्स समाविष्ट करण्याची तयारी करत आहे, ज्यामुळे प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत 80 टक्क्यांपर्यंत रिफंड मिळू शकणार आहे.

Flight Cancellation Refund: शेवटच्या क्षणी तिकीट रद्द केल्यास आता मिळणार 80 टक्के परतावा; सरकार लागू करणार ‘हा’ नियम

Flight Cancellation Refund: हवाई प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अंतिम क्षणी म्हणजे टेकऑफच्या अगदी काही मिनिटांपूर्वी विमानाचे तिकीट रद्द केल्यास आता संपूर्ण रक्कम गमवावी लागणार नाही. केंद्र सरकार तिकिटांमध्ये इनबिल्ट ट्रॅव्हल इन्शुरन्स समाविष्ट करण्याची तयारी करत आहे, ज्यामुळे प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत 80 टक्क्यांपर्यंत रिफंड मिळू शकणार आहे. हा नवा नियम पुढील 2 ते 3 महिन्यांत लागू होण्याची शक्यता आहे.

सध्या काय नियम आहेत?

उड्डाणाच्या 3 तासांत तिकीट रद्द केल्यास ते नो-शो मानले जाते. अशावेळी कुठलाही परतावा मिळत नाही. शेवटच्या क्षणी तिकीट रद्द केल्यास तुम्ही वैद्यकीय आणीबाणी सिद्ध करू शकलात तरच विमान कंपनी पूर्ण परतफेड देईल देते. परंतु, ते देखील पूर्णपणे कंपनीवर अवलंबून आहे.

हेही वाचा – Gold Leasing : सोन्यावर मिळवा वार्षिक 7 टक्क्यांपर्यंत रिटर्न! जाणून घ्या, 'गोल्ड लीजिंग'चे संपूर्ण मॉडेल आणि कमाई कशी करायची?

नवीन नियमात काय बदल?

माध्यमांमधील वृत्तानुसार, विमान वाहतूक सचिव या विषयावर भारतीय विमान कंपन्यांशी चर्चा करत आहेत. ते एक इनबिल्ट विमा योजना आणण्याची योजना आखत आहेत, ज्यासाठी प्रवाशांना काहीही पैसे द्यावे लागणार नाहीत. महत्त्वाचे म्हणजे, प्रवाशांना हा विमा स्वतंत्रपणे खरेदी करावा लागणार नाही. विमान कंपन्यांना प्रीमियम भरावा लागेल. एका मोठ्या विमान कंपनीने आधीच विमा कंपन्यांशी या मॉडेलवर चर्चा केली आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, जर प्रत्येक तिकिटात अंदाजे 50 चा विमा प्रीमियम समाविष्ट केला असेल, तर प्रवाशांनी उड्डाणाच्या 3-4 तास आधी तिकिटे रद्द केली तरीही त्यांना 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.

हेही वाचा – PF Update: EPFO वेतन मर्यादा वाढणार! 1 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना फायदा, जाणून घ्या

परतावा मिळवणे आता सोपे होणार

शेवटच्या क्षणी फ्लाइट रद्द केल्यावर प्रवाशांचा परताव्याचा प्रश्न कायमच जटिल असायचा. त्यावरच प्रवाशांच्या मोठ्या तक्रारी लक्षात घेऊन सरकार आता रिफंडसाठी बेंचमार्क नियम बनवण्याच्या तयारीत आहे.

प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय  

हवाई प्रवास करताना अचानक बदल, आपत्कालीन परिस्थिती, आजारपण किंवा कुठल्याही कारणामुळे शेवटच्या क्षणी तिकीट रद्द करावे लागले तरी आता प्रवाशांना मोठा परतावा मिळू शकणार आहे. नवीन नियम लागू झाल्यास लाखो प्रवाशांचे नुकसान टळेल आणि तिकिटे बुक करतानाची भीतीही कमी होईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number