ITR Deadline Changed: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी; ITR भरण्याच्या अंतिम मुदतीत बदल

आर्थिक वर्ष 2025-26 मधील उत्पन्नाचे विवरण सादर करताना करदात्यांना सुधारित वेळापत्रकाचे पालन करावे लागणार आहे.

ITR Deadline Changed: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी; ITR भरण्याच्या अंतिम मुदतीत बदल

ITR Deadline Changed: प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) भरणाऱ्या कोट्यवधी करदात्यांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्राप्तिकर विभागाने निर्धारण वर्ष (Assessment Year) 2026-27 साठी ITR दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत बदल जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष 2025-26 मधील उत्पन्नाचे विवरण सादर करताना करदात्यांना सुधारित वेळापत्रकाचे पालन करावे लागणार आहे. विशेषतः लहान व्यावसायिक आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना या बदलामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे मानले जात आहे.

वेगवेगळ्या करदात्यांसाठी स्वतंत्र अंतिम मुदती

प्राप्तिकर विभागाने करदात्यांच्या श्रेणीनुसार ITR दाखल करण्यासाठी वेगवेगळ्या अंतिम तारखा निश्चित केल्या आहेत. पगार, पेन्शन आणि भांडवली नफ्यातून (Capital Gains) उत्पन्न मिळवणाऱ्या नोकरदार व निवृत्तीवेतनधारकांनी ITR-1 आणि ITR-2 अंतर्गत आपले विवरणपत्र 31 जुलै 2026 पर्यंत दाखल करणे आवश्यक आहे.

दुसरीकडे, व्यावसायिक उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी ITR-3 आणि ITR-4 दाखल करण्याची मुदत वाढवून 31 ऑगस्ट 2026 करण्यात आली आहे. त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांना आणि व्यावसायिकांना आर्थिक व्यवहारांचा हिशोब पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ उपलब्ध होणार आहे. ज्या करदात्यांसाठी टॅक्स ऑडिट (Tax Audit) बंधनकारक आहे, त्यांच्यासाठी ITR दाखल करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2026 कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, अशा करदात्यांनी आपला ऑडिट अहवाल 30 सप्टेंबर 2026 पूर्वी सादर करणे आवश्यक असेल.

सुधारित आयटीआरसाठी वाढीव मुदत

ITR भरताना झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी करदात्यांना आता अधिक वेळ मिळणार आहे. सुधारित आयटीआर (Revised Return) दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवून 31 मार्च 2027 करण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत मर्यादित होती. त्यामुळे करदात्यांना चुका दुरुस्त करून अचूक माहिती सादर करण्यासाठी अतिरिक्त 3 महिने मिळणार आहेत.

मुदत चुकल्यास किती दंड भरावा लागेल?

प्राप्तिकर विभागाच्या नियमांनुसार, निर्धारित वेळेत ITR न भरल्यास कलम 234F अंतर्गत दंड आकारला जाईल. 31 जुलै 2026 पर्यंत विवरणपत्र दाखल केल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही आणि करदात्यांना उपलब्ध असलेले सर्व कर लाभ मिळतील. दरम्यान, जर ITR 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत दाखल केला, तर वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असल्यास 5,000 दंड भरावा लागेल. उत्पन्न ₹5 लाखांपेक्षा कमी असल्यास 1,000 दंड आकारला जाईल. तसेच या कालावधीत ITR दाखल केल्यास व्यावसायिक तोटा पुढील वर्षासाठी Carry Forward करता येणार नाही आणि Tax Regime बदलण्याचाही पर्याय उपलब्ध राहणार नाही.

हेही वाचा – Gold Silver Prices Today: खरेदीदारांची चांदी! सोने 10 तोळा तब्बल 18,000 रुपयांनी स्वस्त? चांदीच्या दरातही मोठी घसरण

उशिरा ITR भरल्यास होऊ शकते नुकसान

1 जानेवारी ते 31 मार्च 2027 या कालावधीत ITR दाखल केल्यासही 5,000 किंवा 1,000 इतकाच दंड लागू राहील. मात्र, हे विवरणपत्र Belated Return म्हणून ग्राह्य धरले जाईल. त्यामुळे करदात्यांना अनेक महत्त्वाच्या करसवलती आणि लाभ गमवावे लागू शकतात. याशिवाय, अंतिम मुदतीनंतर ITR भरल्यास कर परतावा (Tax Refund) मिळण्यास विलंब होऊ शकतो. तसेच व्याजाचाही तोटा सहन करावा लागू शकतो.  
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number