आज नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात बदल झालेला दिसून येत आहे. सोनं महागलं असून चांदीच्या दरातदेखील मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. गेले अनेक दिवस ही वाढ सातत्याने झालेली दिसत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, 24,22 आणि 18 सोन्याच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. 24 कॅरेटच्या 1 तोळे सोन्याच्या दरात आज 430 रूपयांनी वाढ झाली आहे. याचा अर्थ 24 कॅरेट सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1,12,580 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्यामध्येदेखील वाढ झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 400 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे 22 कॅरेट सोन्यासाठी तुम्हाला 1,03,200 रुपये मोजावे लागणार आहेत.
हेही वाचा - PM Modi On GST 2.0 Reforms: 'GST सुधारणांमुळे सामान्य माणसाची स्वप्ने साकार होणार...'; राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
18 कॅरेट सोन्याच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. 18 कॅरेट दरांमध्ये ३३० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला 84,440 रुपये मोजावे लागणार आहे.
हेही वाचा - GST 2.0 : 22 सप्टेंबरपासून लागू होणार नवे दर, सलूनपासून जिमपर्यंत काय होणार स्वस्त आणि महाग
कुठे गुंतवणूक करावी ?
सोन्याचे भाव त्यांच्या उच्चांकी पातळीजवळ व्यवहार करत आहेत. सोने गुंतवणूकदारांसाठी मोठा प्रश्न आहे की विक्री करावी की जास्त वेळ वाट पहावी. तज्ञांच्या मते, सोने आणि चांदीमध्ये तेजीचा कल कायम राहू शकतो.