Job Opportunity: भारतीय नौदलात भरतीची सुवर्णसंधी! दहावी, बारावी पास तरुणांसाठी ‘अग्निवीर’ पदांची घोषणा; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

भारतीय नौदलाने अग्निवीर योजनेअंतर्गत एसएसआर आणि एमआर पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.

Job Opportunity: भारतीय नौदलात भरतीची सुवर्णसंधी! दहावी,  बारावी पास तरुणांसाठी ‘अग्निवीर’ पदांची घोषणा; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

नवी दिल्ली: भारतीय नौदलात सेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. अग्निवीर योजना (Agniveer Scheme) अंतर्गत वर्ष 2027 साठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये अग्निवीर एसएसआर, अग्निवीर एमआर तसेच एसएसआर मेडिकल या नाविक पदांचा समावेश आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना निर्धारित कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार असून अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

अधिकृत माहितीनुसार अर्ज प्रक्रिया 14 मार्च 2026 पासून सुरू होणार असून 6 एप्रिल 2026 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज पूर्ण करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. अर्जामध्ये काही त्रुटी राहिल्यास त्यात सुधारणा करण्याची संधीही देण्यात येणार आहे. त्यासाठी 10 आणि 11 एप्रिल 2026 या दोन दिवसांसाठी विशेष सुधारणा विंडो खुली ठेवली जाईल.

या भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड लिखित परीक्षा आणि शारीरिक दक्षता चाचणी यांच्या आधारे केली जाईल. प्राथमिक वेळापत्रकानुसार लिखित परीक्षा मे 2026 मध्ये आयोजित केली जाऊ शकते. त्यानंतर परीक्षेचा निकाल जून 2026 मध्ये जाहीर होण्याची शक्यता असून पुढील टप्प्यात इतर निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

हेही वाचा: Harbhajan Singh: कीर्ती आझाद यांच्या 'त्या' वादग्रस्त विधानावर हरभजन सिंग संतापला, म्हणाला 'श्रद्धेवर प्रश्न उपस्थित करणे…'

शैक्षणिक पात्रतेबाबत पाहिले तर अग्निवीर एमआर पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि किमान 50 टक्के गुण असणे गरजेचे आहे. अग्निवीर एसएसआर पदासाठी उमेदवाराने बारावीमध्ये गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह किमान 50 टक्के गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे. याशिवाय संबंधित क्षेत्रातील तीन वर्षांचा डिप्लोमा केलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.

तसेच एसएसआर (मेडिकल) पदासाठी उमेदवाराने बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांसह किमान 50 टक्के गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेबाबतची अचूक माहिती प्रत्येक पदानुसार वेगळी असू शकते, त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

निवड प्रक्रियेत शारीरिक चाचणीला विशेष महत्त्व दिले जाणार आहे. या चाचणीत धावणे, स्क्वॅट्स, पुश-अप्स आणि सिट-अप्स यांसारख्या शारीरिक व्यायामांचा समावेश असेल. उमेदवारांची शारीरिक क्षमता आणि तंदुरुस्ती यावरही अंतिम निवड मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल.

या भरतीसाठी पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करताना उमेदवारांना 550 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल. भरतीशी संबंधित संपूर्ण माहिती, पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी भारतीय नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळावरील अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: Badlapur Egg Selling Racket: बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात मोठा ट्विस्ट; नाशिक आयव्हीएफ सेंटरचे कनेक्शन समोर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number