India GDP Growth 2026: भारताच्या आर्थिक विकासाचा वेग मंदावणार?; ADB ने घटवला GDP वाढीचा अंदाज; ‘हे’ मोठं कारण आलं समोर

एडीबीने आपल्या 'आशियाई डेव्हलपमेंट आउटलुक' (ADO) जुलै 2026 च्या अहवालात स्पष्ट केले आहे की, ऊर्जेच्या उच्च किमतींमुळे वास्तविक उत्पन्नावर ताण येत असल्यामुळे हा अंदाज कमी करावा लागला आहे.

India GDP Growth 2026: भारताच्या आर्थिक विकासाचा वेग मंदावणार?; ADB ने घटवला GDP वाढीचा अंदाज; ‘हे’ मोठं कारण आलं समोर

India GDP Growth 2026: पश्चिम आशियातील वाढत्या संकटामुळे ऊर्जेच्या किमतीत संभाव्य वाढ होण्याची भीती लक्षात घेऊन आशियाई विकास बँकेने (ADB) चालू आर्थिक वर्ष 2026-27 साठी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाचा (GDP) वाढीचा अंदाज 6.9 टक्क्यांवरून कमी करून 6.6 टक्के केला आहे. एडीबीने आपल्या 'आशियाई डेव्हलपमेंट आउटलुक' (ADO) जुलै 2026 च्या अहवालात स्पष्ट केले आहे की, ऊर्जेच्या उच्च किमतींमुळे वास्तविक उत्पन्नावर ताण येत असल्यामुळे हा अंदाज कमी करावा लागला आहे. मात्र, असे असले तरी भारत अजूनही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून अव्वल स्थानी कायम आहे. दुसरीकडे, जागतिक परिस्थितीतील सुधारणा आणि नवीन व्यापार करारांमुळे वाढणारी निर्यातीची स्पर्धात्मकता पाहता, आर्थिक वर्ष 2027-28 साठीचा भारताच्या वाढीचा अंदाज मात्र 7.3 टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे.

अहवालानुसार, परकीय भांडवल आकर्षित करण्यासाठीचे धोरणात्मक उपाय, इंधनावरील करातील कपात, विशिष्ट क्षेत्रांना कर्जपुरवठा, सेवा क्षेत्रातील मजबूत निर्यात आणि सार्वजनिक भांडवली खर्चातील वाढ यांसारख्या गोष्टी देशाच्या विकासाला सातत्याने चालना देत राहतील. परंतु, वाढता भू-राजकीय तणाव आणि हवामानातील बदलांमुळे कृषी क्षेत्राला बसू शकणारा फटका यांसारखे मोठे धोकेही अर्थव्यवस्थेसमोर कायम आहेत. या कारणांमुळे चालू आर्थिक वर्षात महागाई वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, एप्रिलमधील 4.5 टक्क्यांचा अंदाज आता वाढवून 5.2 टक्के करण्यात आला आहे, तर 2027-28 साठीचा महागाईचा अंदाज 4 टक्के इतकाच मर्यादित ठेवण्यात आला आहे. दरम्यान, संपूर्ण विकसनशील आशिया-पॅसिफिक क्षेत्रासाठीचा 2026 मधील आर्थिक वाढीचा अंदाजही कमी करून 4.9 टक्के करण्यात आला आहे, जो पूर्वी 2025 साठी 5.5 टक्के वर्तवण्यात आला होता.

केवळ एडीबी नव्हे, तर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) देखील भारताच्या विकासदराच्या अंदाजात फेरबदल केले आहेत. आरबीआयने गेल्या महिन्यातच 2026-27 साठीचा जीडीपी वाढीचा अंदाज 6.9 टक्क्यांवरून 6.6 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे, तर महागाईचा अंदाज 4.6 टक्क्यांवरून वाढवून 5.1 टक्के केला आहे. 

हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची होणार उच्चस्तरीय चौकशी; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत मोठी घोषणा

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) 'वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक' (WEO) अहवालानुसार, 2026-27 मध्ये भारताचा विकासदर 6.4 टक्के राहण्याची शक्यता आहे, जो त्यांच्या एप्रिलमधील 6.5 टक्क्यांच्या अंदाजापेक्षा किंचित कमी आहे. मात्र, आयएमएफने पुढील आर्थिक वर्षासाठी (2027-28) भारताच्या विकासदराचा अंदाज 6.5 टक्क्यांवरून वाढवून 6.7 टक्के करत भारताच्या आर्थिक क्षमतेवर विश्वास दर्शवला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number