Instagram New Feature: इंस्टाग्राम वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने अखेर ते फीचर आणले आहे, ज्याची सर्व यूजर्स खूप काळापासून वाट पाहत होते. 'Watch History' या फीचरच्या मदतीने आता तुम्ही आधी पाहिलेल्या Reels पुन्हा पाहू शकता. म्हणजेच, जर एखादी मजेशीर किंवा माहितीपूर्ण Reel चुकून स्क्रोल झाली असेल, तरी आता ती पुन्हा सहज शोधता येईल.
बहुतेक वेळा असं होतं की आपण एखादी Reel पाहत असतो आणि अचानक कॉल येतो किंवा अॅप बंद होतं. परत उघडल्यावर ती Reel सापडत नाही आणि चिडचिड होते. पण आता या नव्या फीचरमुळे हा त्रास संपणार आहे. इंस्टाग्रामच्या सीईओ Adam Mosseri यांनी स्वतः या फीचरची घोषणा करत सांगितले की, 'यूजर्सना आता त्यांच्या पाहिलेल्या Reels सहज सापडतील. फक्त Settings मध्ये जाऊन Your Activity या पर्यायावर टॅप करा आणि तिथे तुम्हाला Watch History दिसेल. तिथे तुम्ही आधी पाहिलेल्या सर्व Reels पाहू शकता.'
हेही वाचा: Zoho Pay: गुगल पे, फोन पे आणि पेटीएमचे टेंशन वाढणार, अरत्ताई कंपनीचे झोहो पे लवकरच येणार
या फीचरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, यात तुम्ही Reels शोधताना date, week किंवा month नुसार फिल्टर करू शकता. म्हणजेच, तुम्हाला एखाद्या ठराविक तारखेला पाहिलेली Reel पुन्हा पाहायची असल्यास, ती काही सेकंदांत सापडेल. तसेच, जर एखादी Reel तुम्हाला लिस्टमधून काढून टाकायची असेल, तर ती देखील सहज delete करता येईल.
याबाबत सर्वात रोचक गोष्ट म्हणजे, इंस्टाग्रामने हे फीचर TikTok वरून प्रेरणा घेऊन तयार केले आहे. मात्र, इंस्टाग्रामचे Watch History फीचर अधिक लवचिक (flexible) असल्याचं म्हटलं जात आहे. टिकटॉकवर जिथे मर्यादित पर्याय उपलब्ध असतात, तिथे इंस्टाग्राम यूजर्सना अधिक नियंत्रण मिळणार आहे.
मेटा कंपनी गेल्या काही महिन्यांपासून इंस्टाग्राममध्ये नवनवीन प्रयोग करत आहे. अलीकडेच Reels साठी 'picture-in-picture mode' आणि 'multiple reels linking' सारखे फीचर्स जोडले गेले. आता Watch History फीचर आल्याने यूजर्सचा अनुभव आणखी इंटरअॅक्टिव्ह होणार आहे.
हेही वाचा: AI Layoffs: धोक्याची घंटा! मेटा, गुगल आणि अमेझॉनसह प्रमुख टेक कंपन्यांनी AI शी संबंधित नोकऱ्यांवर लावला ‘ब्रेक’
सोशल मीडियावर व्हिडिओ कंटेंटच्या वाढत्या वापरामुळे यूजर्सना त्यांच्या पाहिलेल्या व्हिडिओंचं ट्रॅक ठेवणं गरजेचं झालं होतं. हे नवीन फीचर त्या गरजेची पूर्तता करेल.
सध्या हे फीचर काही निवडक यूजर्सना उपलब्ध झालं आहे, पण लवकरच ते सर्वांसाठी रोलआउट होईल. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आवडत्या Reels पुन्हा पाहायच्या असतील, तर इंस्टाग्राम अॅप अपडेट ठेवायला विसरू नका.