ITR Refund 2025: उशिरा देण्यात येणाऱ्या आयकर परताव्यावर व्याज मिळते का? काय आहे आयकर विभागाचा नियम?

जर तुम्ही 16 सप्टेंबरपूर्वी तुमचा ITR दाखल केला असेल, आणि परतावा अजून मिळाला नसेल, तर तुम्हाला 1 एप्रिलपासून पैसे मिळेपर्यंत व्याज मिळू शकते.

ITR Refund 2025: उशिरा देण्यात येणाऱ्या आयकर परताव्यावर व्याज मिळते का? काय आहे आयकर विभागाचा नियम?

ITR Refund 2025: अनेक करदाते (Taxpayers) सध्या त्यांच्या आयकर परताव्यासंदर्भात (Income Tax Refund) चिंतेत आहेत, कारण परतावा अद्याप त्यांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही. जर तुम्हीही अशाच स्थितीत असाल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आयकर विभागाकडून उशिरा परतफेडीवर व्याज दिले जाऊ शकते. मात्र, त्यासाठी काही अटी लागू होतात. चला, त्या नियमांविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा –Ration Card: आता घरबसल्या काढता येणार रेशन कार्ड; 'या' ॲपमुळे सोप होणार तुमचं काम

उशिरा परतफेडीवर व्याज मिळते का?

आयकर विभागाच्या नियमांनुसार, जर तुमचा परतावा वेळेत न मिळाल्यास, विभाग तुम्हाला व्याजासह परतावा देतो. जर तुम्ही 16 सप्टेंबरपूर्वी तुमचा ITR दाखल केला असेल, आणि परतावा अजून मिळाला नसेल, तर तुम्हाला 1 एप्रिलपासून पैसे मिळेपर्यंत व्याज मिळू शकते. मात्र, जर तुम्ही ITR उशिरा दाखल केला असेल, तर तुम्हाला ITR दाखल केलेल्या तारखेपासून व्याज मिळेल. म्हणजेच उशिरा फाइल करणाऱ्यांना व्याजाचे नुकसान होऊ शकते.

हेही वाचा – Gold Silver Rate Today: सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये वाढ; दिल्ली, मुंबईसह प्रमुख शहरांमधील दर काय? वाचा

परतावा उशिरा मिळण्याची मुख्य कारणे

बँक तपशील चुकीचा असणे – खाते क्रमांक किंवा IFSC कोड जुळत नसल्यास परतावा अडकतो.
ITR आणि Form 26AS मध्ये विसंगती – TDS किंवा टॅक्स क्रेडिट स्टेटमेंटमध्ये दिलेली माहिती न जुळल्यास प्रक्रिया रखडते.
सुधारित (Revised) ITR दाखल केल्यास – अशा प्रकरणांमध्ये तपासणीसाठी अधिक वेळ लागू शकतो.
ITR Scrutiny साठी निवड – काही प्रकरणे विभाग तपासणीसाठी निवडतो, ज्यामुळे परतफेड विलंबित होते.
अंतिम मुदतीच्या अगोदर ITR दाखल करणे – शेवटच्या क्षणी फाइल केलेले रिटर्न्स बहुधा प्रक्रियेस जास्त वेळ घेतात.

करतज्ज्ञांच्या मते, वेळेत आणि अचूक माहितीने ITR दाखल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणतीही चूक, चुकीचा बँक तपशील किंवा विसंगती परताव्याला विलंब लावू शकते.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number