Health Insurance Renewal: तुमची आरोग्य विमा पॉलिसी संपणार आहे का? नूतनीकरणाआधी जाणून घ्या ‘या’ 7 महत्त्वाच्या गोष्टी!

अनेकदा लोक पॉलिसीची मुदत संपल्यानंतर नूतनीकरण वेळेवर करत नाहीत, आणि त्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो.<br/>

Health Insurance Renewal: तुमची आरोग्य विमा पॉलिसी संपणार आहे का? नूतनीकरणाआधी जाणून घ्या ‘या’ 7 महत्त्वाच्या गोष्टी!

Health Insurance Renewal: सध्याच्या काळात अचानक होणारा वैद्यकीय खर्च अनेक कुटुंबांसाठी आर्थिक संकट बनतो आहे. अशा वेळी आरोग्य विमा पॉलिसी (Health Insurance Policy) ही सुरक्षिततेचे कवच ठरते. मात्र अनेकदा लोक पॉलिसीची मुदत संपल्यानंतर नूतनीकरण वेळेवर करत नाहीत, आणि त्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

पॉलिसी संपल्यावर काय होते?

जेव्हा तुमच्या आरोग्य विम्याची मुदत संपते, तेव्हा कव्हरेज तत्काळ थांबते. बहुतांश वेळा प्रीमियम 1 ते 3 वर्षांसाठी भरला जातो. मुदत संपल्यानंतर जर नूतनीकरण केले नाही, तर विमा कंपनी साधारण 30 दिवसांचा ग्रेस पीरियड देते. या काळात पैसे भरले तर पॉलिसी सुरू राहते. पण जर वेळ निघून गेला, तर पॉलिसी रद्द होते आणि कोणताही दावा (Claim) ग्राह्य धरला जात नाही.

प्रीमियम का वाढतो?

पॉलिसी नूतनीकरण करताना किमान 10 टक्के प्रीमियम वाढ लागू शकते. काहीवेळा हे वाढलेले दर विमा कंपनीच्या नवीन पॉलिसी स्ट्रक्चरनुसार ठरवले जातात.

नूतनीकरण न केल्यास पैसे परत मिळतात का?

पॉलिसीच्या मुदतीदरम्यान तुम्ही दावा केला नसला तरी प्रीमियम परत मिळत नाही. केवळ ‘फ्री-लुक पीरियड’ (15-30 दिवस) मध्ये रद्द केल्यास काही रक्कम परत मिळू शकते.

कंपनीनेच योजना बंद केली तर?

कधी कधी विमा कंपनी स्वतः पॉलिसी बंद करते. केअर हेल्थ इन्शुरन्सचे सीओओ मनीष दोडेजा यांनी सांगितलं की, ग्राहकांना त्यांच्या बदलत्या आरोग्य गरजा पूर्ण करण्यासाठी चांगले कव्हर आणि नवीन वैशिष्ट्ये प्रदान करण्यासाठी हे पाऊल उचलले जाते. सुसंगत कव्हरेज राखण्यासाठी, वेळोवेळी पॉलिसींची तुलना करणे, त्यांचे फायदे आणि तोटे समजून घेणे आणि आवश्यक असल्यास चांगल्या पॉलिसीवर स्थलांतर करणे महत्वाचे आहे.

हेही वाचा –  Gold-Silver Rate : दोन दिवसांच्या दरवाढीनंतर सोनं पुन्हा स्वस्त; चांदीच्या दरात काय बदल? जाणून घ्या

नवीन प्लॅनवर स्विच करायचं का?

पॉलिसी संपल्यावर कंपनी तुम्हाला कॉल, मेसेज किंवा ईमेलद्वारे नूतनीकरणाची सूचना देते. ऑनलाइन नूतनीकरण करता येते. तसेच 24 तासांत पॉलिसी अपडेट होते. जर तुम्हाला दुसऱ्या विमा कंपनीकडे पॉलिसी पोर्ट करायची असेल, तर हे पॉलिसी संपण्याच्या 45 दिवस आधी सुरू करावे. त्यामुळे जुन्या पॉलिसीचे फायदे (जसे की NCB, कव्हरेज) नवीन प्लॅनमध्ये कायम राहतात.

नवीन पॉलिसी घेताना 'हे' लक्षात ठेवा

पूर्वीच्या आजारांचा (Pre-existing diseases) प्रतीक्षा कालावधी माफ केला जातो का ते तपासा. प्रत्येक अट आणि अपवाद (Exclusions) नीट वाचा. विमा कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो आणि ग्राहक सेवेचा दर्जा तपासा.

हेही वाचा – Digital Gold Alert : डिजिटल सोन्यात गुंतवणूक करतायं?; आधी SEBI ने दिलेला 'हा' इशारा नक्की वाचा

नूतनीकरण का गरजेचं आहे?

एकदा पॉलिसी संपल्यास तुम्हाला नव्याने आरोग्य तपासणी करावी लागेल आणि वय वाढल्यामुळे प्रीमियमही वाढू शकतो. त्यामुळे वेळेवर नूतनीकरण केल्याने कव्हरेज सतत चालू राहते आणि अतिरिक्त खर्च टाळता येतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number