Maharashtra Shetkari Mitra Bharti: कृषी विभागाचा मोठा निर्णय! आता गावातच मिळणार ‘शेतकरी मित्र’; 30 टक्के पदे महिलांसाठी, इतके मिळेल मानधन

या योजनेमुळे ग्रामीण भागातील तरुणांना आपल्याच गावात कामाची संधी उपलब्ध होणार असून कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.

Maharashtra Shetkari Mitra Bharti: कृषी विभागाचा मोठा निर्णय! आता गावातच मिळणार ‘शेतकरी मित्र’; 30 टक्के पदे महिलांसाठी, इतके मिळेल मानधन

Maharashtra Shetkari Mitra Bharti: केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांची माहिती थेट गावपातळीवरील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि कृषी विस्ताराच्या कामाला गती देण्यासाठी कृषी विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र कृषी विभागाच्या नवीन धोरणानुसार राज्यात तब्बल 11587 शेतकरी मित्रांची भरती केली जाणार आहे. यामध्ये एकट्या सोलापूर जिल्ह्यासाठी 536 पदे मंजूर करण्यात आली आहेत. या योजनेमुळे ग्रामीण भागातील तरुणांना आपल्याच गावात कामाची संधी उपलब्ध होणार असून कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.

दरमहा 1500 रुपये मानधन आणि दररोज 2 तासांचे काम; 'आत्मा' योजनेंतर्गत मिळणार निधी
निवड झालेल्या शेतकरी मित्रांना दररोज किमान 2 तास काम करणे बंधनकारक असेल. या कामाच्या मोबदल्यात त्यांना 'आत्मा' (ATMA) यंत्रणेच्या निधीतून दरमहा 1500 रुपये, म्हणजेच वर्षाला एकूण 18000 रुपये मानधन दिले जाईल. हे मानधन दर 3 महिन्यांनी एकत्रित अशा 4 टप्प्यांत थेट दिले जाणार आहे. तथापि, या मानधनाव्यतिरिक्त कोणताही अतिरिक्त प्रवास खर्च किंवा इतर कोणतेही देय भत्ते दिले जाणार नाहीत, असे विभागाने स्पष्ट केले आहे.

30 टक्के पदे महिलांसाठी राखीव; 'आत्मा' उपक्रम आणि गावपातळीवरील प्रमुख जबाबदाऱ्या
ग्रामीण महिलांचा शेतीतील सहभाग वाढवण्यासाठी एकूण पदांपैकी 30 टक्के जागा महिलांसाठी लॉटरी पद्धतीने राखीव ठेवण्यात आल्या आहेत. शेतकरी मित्रांवर गावात शेतकरी सुविधा केंद्र चालवणे, महिला व पुरुष शेतकरी गट, अन्न सुरक्षा गट स्थापन करणे आणि त्यांची क्षमता बांधणी करण्याची मुख्य जबाबदारी असेल. याशिवाय शेतीशाळेसाठी शेतकऱ्यांची निवड करणे, कृषी कार्यशाळांचे आयोजन करणे, ग्रामसभेत शासकीय योजनांची माहिती देणे आणि शेतीविषयक उपक्रमांच्या सर्व नोंदी ठेवणे ही कामेही त्यांना पार पाडावी लागतील.

हेही वाचा – Maharashtra 7/12 Utara : सातबारावर नाव नसलेल्या 2.31 लाख शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा; महसूल मंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश

25 ते 60 वयोमर्यादा व 12 वी उत्तीर्णची अट; पदवीधरांना निवडीत प्राधान्य
शेतकरी मित्र पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 25 ते 60 वर्षे वयोगटातील, स्थानिक रहिवासी आणि स्वतःची शेतजमीन असलेला अनुभवशील शेतकरी असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असावा आणि त्याच्यावर कोणताही गुन्हेगारी नोंद नसावी. वृत्तानुसार उच्चशिक्षित किंवा कृषी पदवीधरांना या निवडीत प्राधान्य दिले जाईल. इच्छुक उमेदवारांना सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या ग्राम कृषी विकास समिती केंद्राकडे अर्ज सादर करावे लागतील.

2 वर्षांचा कार्यकाळ अन् बंधपत्र बंधनकारक; कामाच्या मूल्यांकनावर सेवा ठरणार
ही नियुक्ती पूर्णपणे मानधनावर आधारित असून 2 वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे, तसेच ही सेवा नियमित करण्याचा कोणताही दावा उमेदवाराला करता येणार नाही, असे बंधपत्र लिहून द्यावे लागेल. दर 3 महिन्यांनी शेतकरी मित्रांच्या कामाचा आढावा घेतला जाईल आणि वर्षाच्या शेवटी 125 गुणांचे तांत्रिक मूल्यमापन केले जाईल. कामात निष्काळजीपणा किंवा गैरवर्तणूक आढळल्यास थेट सेवा खंडित करून कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही कृषी आयुक्तालयाने दिला आहे.

हेही वाचा – PM Kisan Installment: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 'या' कारणांमुळे पीएम किसानचा पुढील हप्ता खात्यात जमा होण्यास येऊ शकतात अडचणी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number