राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ई-केवायसी पडताळणी आणि दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या योजनेतील लाभार्थ्यांची नव्याने छाननी करण्यात आली असून तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे योजनेतील एकूण लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण ‘ योजनेतून 81 लाख महिला अपात्र ठरल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. याचसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी महत्वाची अपडेट दिली आहे. तसेच अपात्र 81 लाख बहिणींच्या प्रकरणानंतर 24 तासांतच 2 मोठे निर्णय घेण्यात आल्याची माहितीदेखील समोर आली आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, अपात्र ठरलेल्या 80 लाख महिलांकडून पैशांची वसूली होणार नाही. त्यामुळे या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच लाडकी बहीण या योजनेतील लाभार्थ्यांची डेटाबेसद्वारे पडताळणी करण्यात आल्यानंतर तब्बल 14 हजार पुरूषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
या प्रकारामुळे तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्या आणि केवळ 1 कोटी 66 लाख महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरल्या. त्यामुळे ज्या महिला अपात्र ठरल्या त्यांना दिल्या जाणाऱ्या रक्कमेची वसुली होणार का ? असा सवाल अनेक महिलांच्या मनात होता. यावर आता उपाय काढण्यात आला आहे. जे पुरुष या योजनेचा लाभ घेत होते आता त्यांच्याकडूनच या महिलांचे पैसे वसूल केले जाणार आहेत. त्यामुळे या पुरुषांना दणका बसणार असून शासकीय योजनेत गैरप्रकार करण त्यांना चांगलंच भोवलं आहे.