लेनोव्होने (Lenovo) भारतात आपला नवा टॅबलेट लेनोव्हो आयडिया टॅब प्लस (Lenovo Idea Tab Plus) लॉन्च केला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा टॅबलेट विशेषतः विद्यार्थी (Students) आणि Gen Z वापरकर्त्यांसाठी डिझाइन करण्यात आला असून, शिक्षण, क्रिएटिव्ह कामे आणि मनोरंजनासाठी तो उपयुक्त ठरणार आहे. 5G सपोर्ट आणि दमदार डिस्प्लेमुळे हा टॅबलेट परफॉर्मन्स आणि मोबिलिटी यांचा चांगला समतोल साधतो.
लेनोव्हो आयडिया टॅब प्लसची भारतातील सुरुवातीची किंमत 27,999 रुपये आहे. या किमतीत 12GB RAM/256GB स्टोरेज Wi-Fi आणि 8GB RAM/256GB स्टोरेज + 5G हे व्हेरिएंट्स उपलब्ध आहेत. तर 12GB RAM/256GB स्टोरेज + 5G व्हेरिएंटची किंमत 30,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या किंमत श्रेणीत इतकी जास्त RAM, स्टोरेज आणि 5G सपोर्ट देणारा हा एकमेव टॅबलेट असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हा टॅबलेट Luna Grey रंगात उपलब्ध आहे.
लेनोव्हो इंडिया (Lenovo India) चे डायरेक्टर आणि कॅटेगरी हेड आशिष सिक्का (Ashish Sikka) यांनी सांगितले की, “नवा Idea Tab Plus शक्तिशाली परफॉर्मन्स आणि विश्वासार्ह 5G कनेक्टिव्हिटी देतो. त्यामुळे विद्यार्थी कुठेही आणि कधीही शिक्षण घेवू शकतात.”
डिझाइनच्या बाबतीत हा टॅबलेट 6.29mm स्लिम मेटल बॉडीसह येतो आणि त्याचे वजन फक्त 530 ग्रॅम आहे. यामध्ये 2.5K IPS डिस्प्ले, 800 निट्स पीक ब्राइटनेस आणि 90Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे, ज्यामुळे ऑनलाइन क्लासेस, वाचन, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि स्केचिंगचा अनुभव अधिक चांगला मिळतो.
परफॉर्मन्ससाठी लेनोव्हो आयडिया टॅब प्लसमध्ये MediaTek Dimensity 6400 Octa-Core प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबत 12GB पर्यंत RAM आणि 256GB स्टोरेज मिळते, जे microSD कार्डद्वारे वाढवता येते. सर्व व्हेरिएंट्ससोबत Lenovo Tab Pen दिला जातो, ज्यामुळे हस्तलिखित नोट्स, डॉक्युमेंट्सवर अॅनोटेशन आणि स्केचिंग सहज करता येते. याशिवाय, टॅबलेटमध्ये Lenovo AI Notes, Circle to Search with Google आणि Google Gemini सपोर्ट देण्यात आला आहे, जो रिसर्च, माहितीचा सारांश आणि आयडिया डेव्हलप करण्यासाठी उपयुक्त ठरतो.
कॅमेऱ्याबाबत सांगायचे झाल्यास, यात 8MP फ्रंट कॅमेरा आणि 13MP रियर कॅमेरा आहे. लेनोव्हो आयडिया टॅब प्लसमध्ये 10,200mAh बॅटरी देण्यात आली असून, ती 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी 5G Sub-6 GHz, Wi-Fi 5, Bluetooth 5.2 आणि GPS (GLONASS व Galileo सपोर्टसह) सुविधा मिळतात. त्यामुळे हा टॅबलेट अभ्यास, काम आणि मनोरंजनासाठी एक परिपूर्ण पर्याय ठरू शकतो.
हेही वाचा: Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प BBC विरोधात आक्रमक, ठोकला मानहानीचा दावा, नेमकं प्रकरण काय?