Tuesday, November 18, 2025 02:58:19 AM

Maharashtra board exams: महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय! HSC–SSC परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार

येत्या दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी महाराष्ट्र बोर्डाने कडक नियम लागू केले.

maharashtra board exams महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय hsc–ssc परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार

Maharashtra board exams: दहावी आणि बारावीचे पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने यंदाच्या परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी अनेक कडक उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाच्या सूत्रांनुसार यंदा कंट्रोल रूमपासून वर्गापर्यंत निरीक्षण आणखी तगडं होणार आहे आणि केंद्रांवर नियम मोडला तर थेट मान्यता रद्द करण्याची शक्यता राहणार आहे.

गेल्या काही वर्षांत काही जिल्ह्यांतून कॉपीचे प्रकार, प्रश्नपत्रिका लीकचे संशय, बाहेरून उत्तरे सांगण्याचे तंत्र असे अनेक प्रकार समोर आले. त्यानंतर मंडळावर दबाव वाढत होता की परीक्षा प्रक्रिया अधिक तंत्रज्ञानाधारित बनवण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर आता जे निर्णय घेतले गेले आहेत ते याच कारणातून.

हेही वाचा:CBSE Board Exam 2026: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! CBSE बोर्डाकडून 10वी आणि 12वीचे अंतिम वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधीपासून सुरू होणार परीक्षा

प्रथम प्रत्येक परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा असणं बंधनकारक केले गेले आहे. एवढंच नाही तर त्या रेकॉर्डिंगचा डेटा 30 दिवस जतन ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे नंतर संशय आला तरी फुटेज मागवून चौकशी करता येईल. मंडळाचे मत असे की या एकाच बदलाने कॉपीचा 50 टक्के धोका तसा कमी होतो.

दुसरा मोठा बदल म्हणजे संवेदनशील केंद्रांवर ड्रोनद्वारे निगराणी. यंदा काही शहरांमध्ये परीक्षेच्या दिवशी केंद्राच्या परिसरावरून ड्रोनकॅमद्वारे नजर ठेवली जाणार आहे. संशयास्पद हालचाली, संशयास्पद व्यक्ती, व्हॉट्सअ‍ॅप/मोबाईलवरून पेपर-आंसरचा बाहेर संपर्क  या सर्वांवर ड्रोनमॉनिटरिंग मदत करणार असल्याचं मंडळाचे निरीक्षण आहे.

हेही वाचा:10th, 12th Board Exam Time Table: दहावी-बारावीच्या परीक्षा कधी होणार?, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

तिसरा मुद्दा कलम 144. म्हणजेच चारपेक्षा अधिक व्यक्तींची गर्दी केंद्र परिसरात टाळली जाणार. परीक्षेच्या दिवशी केंद्राजवळ अनावश्यक चर्चा किंवा जमाव यावर तातडीने कारवाई होऊ शकते. अनेक वेळा बाहेरून उत्तरं सांगणारे ग्रुप्स, मध्यस्थ, ट्युटर गँग्ज अशा गर्दीत मिसळतात ही अडचण थांबवण्यासाठी ही पद्धत. तसेच, या वर्षी परीक्षेपूर्वीच 15 नोव्हेंबरपासून  सर्व केंद्रांची प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे. ज्या केंद्रांवर पक्की भिंत, सीसीटीव्ही, स्वच्छतागृह अशा आवश्यक सुविधा नाहीत  त्यांची मान्यता थेट रद्दही होऊ शकते. 


सम्बन्धित सामग्री