वर्षभर अभ्यास केला, परिक्षा दिली आता वेळ आली आहे निकालाची. 12 वीच्या विद्यार्थ्यांची निकालीच उत्सुकता शिगेला पोहोचली असून निकाल कधी लागणार हे जाणून घेण्यास सर्वच विद्यार्थी अधीर झाले आहेत. याच 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आता मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच एचएससी निकाल 2026 जाहीर करण्याच्या तयारीत आहे.
मंडळाने आपल्या अधिकृत वेबसाइटवर निकाल तपासण्याची लिंक सक्रिय केली आहे. येत्या एक-दोन दिवसांत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थी आपले गुण जाणून घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.
निकाल जाहीर करण्यापूर्वी मंडळाकडून डेटा अपलोड आणि तांत्रिक तपासणी पूर्ण करण्यात येत आहे. त्यानंतर एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे निकालाची तारीख आणि वेळ निश्चित केली जाईल. यावर्षी महाराष्ट्र बोर्डाची एचएससी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 दरम्यान घेण्यात आली. या परीक्षेला 14 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते आणि आता ते त्यांच्या निकालाची वाट पाहत आहेत.
असा चेक करा तुमचा रिझल्ट
– HSC रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
– तुमचा रोल नंबर आणि इतर माहिती भरा.
– ते सबमिट केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
– तुमची मार्कशीट डाऊनलोड करा
'या' वेबसाईट्सवर निकाल तपासू शकता
1) mahresult.nic.in
2) hscresult.mkcl.org
3) results.digilocker.gov.in
4) mahahsscboard.in