NPS New Rules: नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये मोठे बदल; PFRDA कडून 5 महत्त्वाच्या अपडेट्ससह नवीन पारदर्शक नियम लागू

पेन्शन फंड नियामक असलेल्या 'पीएफआरडीए'ने (PFRDA) NPS योजनांचे वर्गीकरण, त्यांची नावे आणि सादरीकरण यासाठी एक नवीन व पारदर्शक आराखडा जाहीर केला आहे.

NPS New Rules: नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये मोठे बदल; PFRDA कडून 5 महत्त्वाच्या अपडेट्ससह नवीन पारदर्शक नियम लागू

NPS New Rules: नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लाखो पगारदार कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन योजनांच्या सदस्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पेन्शन फंड नियामक असलेल्या 'पीएफआरडीए'ने (PFRDA) NPS योजनांचे वर्गीकरण, त्यांची नावे आणि सादरीकरण यासाठी एक नवीन व पारदर्शक आराखडा जाहीर केला आहे. सर्व पेन्शन फंड योजनांमध्ये एकसमानता आणणे आणि सदस्यांना जोखीम व परताव्याची तुलना करणे सोपे जावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे.  नवीन नियमानुसार आता सर्व NPS योजनांचे 5 प्रमुख श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाणार आहे. यामध्ये 'लाइफसायकल-आधारित योजना', 'ॲक्टिव्ह चॉइस', 'NPS संचय', '4A योजना' (ज्यात वात्सल्य, स्वास्थ्य व MSME चा समावेश आहे) आणि 'मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क' (MSF) या 5 श्रेणींचा समावेश असेल.

30 दिवसांच्या आत बदलावी लागणार योजनांची नावे; दिशाभूल टाळण्यासाठी निर्णय

गुंतवणूकदारांची दिशाभूल टाळण्यासाठी PFRDA कडून नामकरणाचे एक मानक स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. आता प्रत्येक MSF योजनेच्या नावात फंड हाऊसचे नाव, 'NPS', श्रेणीचा कोड आणि योजनेचे नाव असणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच टियर-2 खाते असल्यास नावाच्या शेवटी 'Tier 2' असे लिहावे लागेल. परिपत्रक जारी झाल्यापासून अवघ्या 30 दिवसांच्या आत सर्व पेन्शन फंड्सना त्यांच्या विद्यमान योजनांची नावे या नवीन नियमानुसार बदलावी लागणार आहेत.

45 दिवसांत योजनांचे विलीनीकरण 

नवीन नियमावलीनुसार, कोणतेही पेन्शन फंड (उदा. SBI, LIC किंवा HDFC) टियर-1 किंवा टियर-2 अंतर्गत एका श्रेणीमध्ये जास्तीत जास्त 2 योजनाच चालवू शकतील. एकापेक्षा जास्त योजना असल्यास पुढील 45 दिवसांच्या आत त्यांचे विलीनीकरण किंवा पुनर्रचना करणे बंधनकारक असेल. या बदलांची माहिती सदस्यांना आधीच दिली जाईल.

हेही वाचा – Railway Rules : रेल्वे प्रवाशांसाठी मोठा धक्का; प्रवासादरम्यान 'या' 6 चुका केल्यास भरावा लागणार दुप्पट दंड

फंड बदलाची लवचिकता कायम; योजना बंद झाल्यास ऑटो-शिफ्टची सोय

गुंतवणूकदारांना एका आर्थिक वर्षात 2 वेळा आपला पेन्शन फंड किंवा गुंतवणूक योजना बदलण्याची मुभा असेल, ज्यामुळे मूळ 'वेस्टिंग कालावधी'वर कोणताही परिणाम होणार नाही. जर एखादी MSF योजना बंद झाली, तर सदस्यांना दुसऱ्या योजनेत जाण्याचा पर्याय मिळेल. गुंतवणूकदाराने कोणताही पर्याय न निवडल्यास, त्यांना आपोआप 'LC 50 – Moderate (10E/55Y)' या योजनेत हस्तांतरित केले जाईल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number