Gold Silver Rate Today: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या मुंबई, पुणे आणि दिल्लीतील आजचे ताजे दर

पश्चिम आशियातील वाढता भू-राजकीय तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि अमेरिकन ट्रेझरी यील्ड्समधील वाढ यांमुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे.

Gold Silver Rate Today: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या मुंबई, पुणे आणि दिल्लीतील आजचे ताजे दर

Gold Silver Rate Today: जागतिक घडामोडी आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे सोमवार, 18 मे रोजी सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी अस्थिरता दिसून आली. पश्चिम आशियातील वाढता भू-राजकीय तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि अमेरिकन ट्रेझरी यील्ड्समधील वाढ यांमुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX), 5 जून रोजी डिलिव्हरी होणाऱ्या सोन्याच्या फ्युचर्सचे दर सकाळी 11 वाजेच्या सुमारास 10 ग्रॅममागे 1,58,697 रुपये नोंदवले गेले. व्यवहारादरम्यान सोन्याने 1,58,884 रुपयांचा उच्चांक, तर 1,57,547 रुपयांचा नीचांक गाठला. चांदीच्या दरातही मोठी चढ-उतार पाहायला मिळाली असून, 3 July च्या फ्युचर्सचे दर प्रति किलो 2,71,627 रुपयांवर पोहोचले आहेत.

जागतिक घटक आणि महागाईची चिंता
अमेरिकेतील महागाईचे आकडे अपेक्षेपेक्षा मजबूत आल्याने अमेरिकन डॉलर वधारला असून, फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता धूसर झाली आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते, पश्चिम आशियातील ऊर्जा पुरवठ्यात व्यत्यय येण्याची भीती आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे जागतिक स्तरावर कडक पतधोरण राबवले जाण्याची शक्यता आहे. याचा नकारात्मक परिणाम सोने आणि चांदीसारख्या मालमत्तांवर झाला आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर 0.39 टक्क्यांनी घसरून प्रति औंस 4,543 डॉलर्सवर आले आहेत, तर चांदी 75.778 डॉलर्सवर पोहोचली आहे.

भारतातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर (प्रति 1 ग्रॅम)

भारतातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर पाहता, चेन्नईमध्ये सोन्याचे भाव सर्वाधिक आहेत. चेन्नईत 24 कॅरेट सोन्याचा दर 15,637 रुपये, 22 कॅरेटसाठी 14,750 रुपये आणि 18 कॅरेटसाठी 12,310 रुपये प्रति ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 15,637 रुपये असून, 22 कॅरेटसाठी 14,335 रुपये आणि 18 कॅरेटसाठी 11,732 रुपये मोजावे लागत आहेत. तर मुंबई, पुणे, बंगळुरू आणि कोलकाता या शहरांमध्ये सोन्याचे दर एकसारखेच दिसून येत आहेत. या चारही शहरांत 24 कॅरेट सोन्याचा दर 15,622 रुपये, 22 कॅरेटसाठी 14,320 रुपये आणि 18 कॅरेटसाठी 11,717 रुपये प्रति ग्रॅम इतका स्थिर आहे.

हेही वाचा – Petrol-Diesel Price: डिझेल आणि पेट्रोल आणखी महाग होणार? रशियन तेल खरेदीवर अमेरिकन सवलत संपल्याने वाढली भारताची चिंता

कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ
संयुक्त अरब अमिरातीमधील एका अणु-सुविधेवर हल्ला झाल्याच्या वृत्ताने तेल बाजारात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पुरवठा विस्कळीत होण्याच्या भीतीने ब्रेंट क्रूड 2.37 टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल 111.86 डॉलर वर, तर WTI क्रूड 3.11 टक्क्यांनीवाढून 108.70 डॉलरवर पोहोचले आहे. वाढत्या इंधन दरांचा थेट परिणाम महागाईवर होत असल्याने मौल्यवान धातूंच्या किमती दबावाखाली आहेत. 

भारतातील प्रमुख शहरांमधील चांदीचे दर (प्रति किलो)
चांदीच्या दरातही शहरानुसार तफावत दिसून येत आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू आणि कोलकाता या शहरांमध्ये चांदीचा दर प्रति किलो 2,90,000 रुपये (प्रति ग्रॅम 290 रुपये) इतका आहे. मात्र, चेन्नईमध्ये चांदीचे दर काहीसे चढे असून तिथे प्रति किलोसाठी 3,00,000 रुपये (प्रति ग्रॅम 300 रुपये) मोजावे लागत आहेत. जागतिक स्तरावर UBS या संस्थेने चांदीच्या गुंतवणुकीचा मागणीचा अंदाज कमी केल्याने बाजारातील वातावरणावर परिणाम झाला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number