Medicine Price Update: सर्वसामान्यांना मोठा दिलासा! हृदयविकार, मधुमेह आणि रक्तदाबाची 39 औषधे होणार स्वस्त

दररोज औषधोपचार करावे लागणाऱ्या मधुमेह, उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) आणि हृदयविकाराच्या रुग्णांचा मासिक खर्च कमी करण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

Medicine Price Update: सर्वसामान्यांना मोठा दिलासा! हृदयविकार, मधुमेह आणि रक्तदाबाची 39 औषधे होणार स्वस्त

Medicine Price Update: वाढत्या आरोग्य खर्चामुळे त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. दररोज औषधोपचार करावे लागणाऱ्या मधुमेह, उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) आणि हृदयविकाराच्या रुग्णांचा मासिक खर्च कमी करण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 'नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी'ने (NPPA) एकूण 39 औषध प्रकारांच्या किरकोळ किमती निश्चित केल्या आहेत. रसायन आणि खते मंत्रालयाने 'ड्रग्ज (प्राइसेस कंट्रोल) ऑर्डर (DPCO), 2013' अंतर्गत ही अधिसूचना जारी केली असून, यामुळे फार्मा कंपन्यांना ठरवून दिलेल्या दरांपेक्षा जास्त किंमत आकारता येणार नाही. अवाजवी दर आकारणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

हृदयविकार, स्ट्रोक आणि डोळ्यांच्या संसर्गावरील औषधांचा नव्या किमतींमध्ये समावेश

सरकारने निश्चित केलेल्या यादीमध्ये गंभीर आणि जुनाट आजारांशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या औषध श्रेणींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकाराच्या गोळ्यांशिवाय डोळ्यांचे संक्रमण, ॲलर्जी, एचआयव्ही (HIV) तसेच स्ट्रोक आणि हृदयविकाराच्या झटक्याशी संबंधित आपत्कालीन औषधांचा समावेश आहे. विशेषतः रक्ताच्या गुठळ्या विरघळवणारी (clot-busting) औषधे या नियंत्रणामुळे रुग्णांना योग्य दरात उपलब्ध होणार आहेत, ज्यामुळे वैद्यकीय आणीबाणीच्या काळात सर्वसामान्य कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळेल.

रक्ताच्या गुठळ्या विरघळवणाऱ्या महागड्या इंजेक्शनच्या किमतीवर मर्यादा 

या नवीन दरांच्या यादीमध्ये हृदयविकाराचा झटका आल्यावर रक्ताच्या घातक गुठळ्या विरघळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'टेनेक्टेप्लेस' (Tenecteplase – TNK-tPA) या अत्यंत महागड्या आणि प्रगत इंजेक्शनचा समावेश आहे. सरकारने याच्या प्रति व्हायलची (vial) किंमत 60,238.27 रुपये निश्चित केली आहे. यासोबतच उच्च रक्तदाबासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या 'अम्लोडिपिन-बिझोप्रोलॉल-टेल्मिसार्टन' या एकाच गोळीची (टॅब्लेट) किंमत 14.74 रुपये करण्यात आली आहे.

हेही वाचा – Water Tank Gadget: आता टाकी भरण्याची चिंता सोडा! पाणी आणि विजेची करा बचत; 'स्मार्ट वॉटर लेव्हल कंट्रोलर' ठरेल उत्तम पर्याय

डोळ्यांचे ड्रॉप्स आणि इतर जीवनरक्षक कॅप्सूलच्या दरातही मोठी कपात

डोळ्यांच्या शस्त्रक्रियेनंतर किंवा जिवाणूजन्य संसर्गावर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या 'नेपाफेनाक-मोक्सीफ्लोक्सासिन' या आय-ड्रॉपची किंमत आता प्रति मिली 68.64 रुपये इतकी असणार आहे. याव्यतिरिक्त, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी डॉक्टरांकडून सर्रास लिहून दिल्या जाणाऱ्या 'क्लोपिडोग्रेल + ॲस्पिरिन + ॲटोरवास्टॅटिन' या महत्त्वाच्या कॅप्सूलची किंमत प्रति कॅप्सूल 6.37 रुपये निश्चित करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लाखो रुग्णांची खाजगी औषध कंपन्यांकडून होणाऱ्या आर्थिक लुबाडणुकीतून सुटका होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number