IRCTC New Rules : रेल्वेने बदलले ऑनलाईन बुकिंगचे नियम; IRCTC अकाउंट आधारशी लिंक नसेल तर मिळणार नाही कन्फर्म तिकीट

प्रवासी अनेकदा तक्रार करतात की, रिझर्व्हेशन विंडो उघडताच काही मिनिटांत सर्व तिकिटे संपतात. दलाल आणि बनावट सॉफ्टवेअर वापरणारे लोक बनावट आयडीवरून तिकिटे उचलतात. हे रोखण्यासाठी रेल्वेने..

IRCTC New Rules : रेल्वेने बदलले ऑनलाईन बुकिंगचे नियम; IRCTC अकाउंट आधारशी लिंक नसेल तर मिळणार नाही कन्फर्म तिकीट

IRCTC New Rules : जर तुम्ही रेल्वेने प्रवास करण्यासाठी वारंवार ऑनलाइन तिकीट बुक करत असाल, तर आता तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. रेल्वेने तिकीट काळाबाजार आणि बनावट अकाऊंट्सना लगाम घालण्यासाठी 'आयआरसीटीसी' (IRCTC) च्या नियमांमध्ये क्रांतिकारी बदल केले आहेत. आतापासून कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी केवळ नशीब नाही, तर तुमचे आधार कार्डही तुमच्या आयआरसीटीसी प्रोफाइलशी लिंक असणे अनिवार्य झाले आहे. ज्या प्रवाशांनी अद्याप आपले आधार व्हेरिफिकेशन पूर्ण केलेले नाही, त्यांना आता तिकीट बुकिंगसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

विना-आधार युजर्सना 'प्राइम टाइम'मध्ये बंदी
रेल्वेने लागू केलेल्या नवीन नियमांनुसार, 5 जानेवारीपासून आधार लिंक नसलेल्या युजर्सवर मोठी मर्यादा आणली आहे. आता ज्यांचे अकाऊंट आधारशी जोडलेले नाही, अशा लोकांना सकाळी 8:00 ते संध्याकाळी 4:00 या अत्यंत महत्त्वाच्या वेळेत ऑनलाइन तिकीट बुक करता येणार नाही. विशेष म्हणजे, याच काळात 'ॲडव्हान्स रिझर्व्हेशन'च्या बहुतांश जागा बुक होतात. याउलट, ज्यांचे अकाऊंट आधार व्हेरिफाईड आहे, ते प्रवासी सकाळी 8:00 वाजल्यापासून कोणत्याही अडथळ्याशिवाय तिकीट बुक करू शकतील, ज्यामुळे त्यांना कन्फर्म सीट मिळण्याची शक्यता कैक पटीने वाढणार आहे.

12 जानेवारीनंतर संपूर्ण दिवस बुकिंग बंद!
हा नियम केवळ सुरुवातीच्या काही तासांपुरता मर्यादित नाही, तर 12 जानेवारीनंतर रेल्वे प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलण्याचे ठरवले आहे. 11 जानेवारीपर्यंत विना-आधार युजर्सना ठराविक वेळेत सवलत मिळेल, मात्र 12 जानेवारीपासून ज्यांचे आयआरसीटीसी अकाऊंट आधारशी लिंक नसेल, त्यांना संपूर्ण दिवसभर म्हणजे सकाळी 8:00 ते रात्री 12:00 वाजेपर्यंत ऑनलाइन तिकीट बुक करण्याची सुविधाच उपलब्ध राहणार नाही. म्हणजेच, आधार लिंक नसेल तर ऑनलाइन तिकीट काढणे जवळपास अशक्य होणार आहे.

हेही वाचा – IRCTC Special Tour: शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! महाशिवरात्रीनिमित्त IRCTCने भाविकांसाठी जाहीर केली खास टूर

तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठीचा 'मास्टरस्ट्रोक'
प्रवासी अनेकदा तक्रार करतात की, रिझर्व्हेशन विंडो उघडताच काही मिनिटांत सर्व तिकिटे संपतात. दलाल आणि बनावट सॉफ्टवेअर वापरणारे लोक बनावट आयडीवरून तिकिटे उचलतात. हे रोखण्यासाठी रेल्वेने आधार लिंक करण्याचा 'मास्टरस्ट्रोक' खेळला आहे. आधार व्हेरिफिकेशनमुळे प्रत्येक युजरची ओळख स्पष्ट होणार असल्याने एकाच व्यक्तीला अनेक बनावट अकाऊंट्स वापरता येणार नाहीत. यामुळे सामान्य प्रवाशांना रास्त दरात आणि पारदर्शक पद्धतीने तिकीट मिळणे सोपे होणार आहे.

काउंटरवरील तिकिटांसाठीही ओन्ली 'OTP'
हा बदल केवळ ऑनलाइन प्रवाशांपुरता मर्यादित नाही, तर येणाऱ्या काळात रेल्वे काउंटरवरून तिकीट काढणाऱ्यांसाठीही नियम बदलले जाऊ शकतात. आता काउंटरवर तिकीट घेताना तुमच्या मोबाईलवर OTP व्हेरिफिकेशन बंधनकारक केले जाण्याची शक्यता आहे. भविष्यात तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असणेही रेल्वे अनिवार्य करू शकते. त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी आणि विनासायास प्रवासाचा आनंद घेण्यासाठी, आजच तुमचे आयआरसीटीसी अकाऊंट (IRCTC Account) आधारशी जोडून घेणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे.

हेही वाचा – Temple Trails of Dakshin : रामेश्वरम् ते मदुराई.. दक्षिण भारतातील तीर्थयात्रेची पर्वणी! IRCTC ची ''टेम्पल ट्रेल्स ऑफ दक्षिण'' विशेष रेल्वे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number