BMW Job: पदवी नाही, तरीही BMW ने 19 वर्षीय मराठमोळ्या तरुणीला दिली नोकरी; अखेर का घेतला कंपनीने असा निर्णय? वाचा

गौरी मोरे या मराठमोळ्या तरुणीची यशोगाथा सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जगप्रसिद्ध लक्झरी कार उत्पादक कंपनी 'BMW' ने गौरीची कोणत्याही पदवीशिवाय पूर्णवेळ 'मार्केटिंग' पदासाठी निवड केली आहे.

BMW Job: पदवी नाही, तरीही BMW ने 19 वर्षीय मराठमोळ्या तरुणीला दिली नोकरी; अखेर का घेतला कंपनीने असा निर्णय? वाचा

BMW Job: आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी (Degree) असून चालत नाही, तर तुमच्याकडे कौशल्य असणे किती महत्त्वाचे आहे, हे एका मराठमोळ्या 19 वर्षीय तरुणीने सिद्ध करून दाखवले आहे. गौरी मोरे या मराठमोळ्या तरुणीची यशोगाथा सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जगप्रसिद्ध लक्झरी कार उत्पादक कंपनी 'BMW' ने गौरीची कोणत्याही पदवीशिवाय पूर्णवेळ 'मार्केटिंग' पदासाठी निवड केली आहे. विशेष म्हणजे, ज्या पदासाठी किमान 5 वर्षांच्या अनुभवाची गरज असते, तिथे गौरीने आपल्या कौशल्याच्या जोरावर स्थान मिळवले आहे.

'पर्सनल ब्रँडिंग'ची ताकद; कोणत्याही अर्जाशिवाय मिळाली नोकरी
गौरीच्या या यशामागे तिचे सोशल मीडियावरील प्रभावी 'पर्सनल ब्रँडिंग' कारणीभूत आहे. लिंक्डइनवर तिचे 65,000 हून अधिक आणि इन्स्टाग्रामवर 35,000 हून अधिक फॉलोअर्स आहेत. गौरीने स्वतः खुलासा केला की, या नोकरीसाठी तिने कोणताही औपचारिक अर्ज केला नव्हता किंवा ईमेल पाठवला नव्हता. तिचे डिजिटल प्रोफाइल आणि कामाची पद्धत पाहून खुद्द कंपनीनेच तिच्याशी संपर्क साधला. केवळ एका आठवड्यात तिला BMW सह इतर 3 मोठ्या कंपन्यांनीही नोकरीच्या संधी देऊ केल्या होत्या.

कठोर परिश्रम आणि सातत्य: 'टाटा मोटर्स'सोबत कामाचा अनुभव
हे यश केवळ नशिबाचा खेळ नसून, गौरीच्या गेल्या काही वर्षांतील कठोर परिश्रमाचे फळ आहे. तिने यापूर्वी 'टाटा मोटर्स' (Tata Motors) सारख्या दिग्गज कंपनीसोबत काम केले आहे. ती सातत्याने सोशल मीडियावर दर्जेदार मजकूर (Content) शेअर करत असते. तज्ज्ञांच्या मते, आजच्या काळात तुमचे सोशल मीडिया प्रोफाईल हे एखाद्या 'डिजिटल पोर्टफोलिओ'सारखे काम करते. जर तुमच्याकडे योग्य कौशल्य असेल आणि ते जगासमोर मांडण्याची कला असेल, तर मोठ्या कंपन्या स्वतः तुमच्या शोधात येतात, हे गौरीने सिद्ध केले आहे.

हेही वाचा – NTA Exam Updates : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता JEE आणि NEET चे सर्व अपडेट्स मिळणार फेसबुक-इन्स्टाग्रामवर; NTA चा मोठा निर्णय

गौरीच्या या यशामुळे आता व्यावसायिक जगात 'पदवी महत्त्वाची की कौशल्य?' या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. अनेक तरुण व्यावसायिक याला आधुनिक करिअरची नवी दिशा मानत आहेत. मात्र, काही जुन्या जाणत्या लोकांच्या मते औपचारिक शिक्षणाचे महत्त्व आजही अबाधित आहे. तरीही, पारंपारिक वाटेपेक्षा वेगळे काहीतरी करून स्वतःची ओळख निर्माण करू पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी गौरीची ही गोष्ट एक मोठा प्रेरणास्रोत ठरली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number