Income Tax Website: आता CA कडे जाण्याची गरज नाही! आयकर विभागाने लाँच केले ‘हे’ खास AI पोर्टल

यापूर्वी साध्या तांत्रिक बाबी समजून घेण्यासाठी करदात्यांना चार्टर्ड अकाउंटंट्स (CAs) कडे जावे लागत असे. मात्र आता हा AI चॅटबॉट तुमच्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी 24 तास सज्ज आहे.

Income Tax Website: आता CA कडे जाण्याची गरज नाही! आयकर विभागाने लाँच केले ‘हे’ खास AI पोर्टल

Income Tax Kar Saathi Website: करदात्यांना कर भरण्याचा अनुभव अधिक सुलभ आणि सुव्यवस्थित देण्यासाठी आयकर विभागाने तंत्रज्ञानाचा वापर करत एक पाऊल पुढे टाकले आहे. विभागाने ‘Kar Saathi’ (कर साथी) नावाचे एक नवीन, तंत्रज्ञान-आधारित AI पोर्टल सुरू केले आहे. आयकर विभागाने ‘X’ (पूर्वीचे Twitter) वर या उपक्रमाची अधिकृत घोषणा केली. या पोर्टलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कर-संबंधित सर्व माहिती आता एकाच व्यासपीठावर उपलब्ध असेल. यापूर्वी साध्या तांत्रिक बाबी समजून घेण्यासाठी करदात्यांना चार्टर्ड अकाउंटंट्स (CAs) कडे जावे लागत असे. मात्र आता हा AI चॅटबॉट तुमच्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी 24 तास सज्ज आहे. विशेषतः पहिल्यांदाच कर भरणाऱ्या तरुणांसाठी हे पोर्टल मार्गदर्शक ठरेल.

CBDT कडून फॉर्मच्या संख्येत मोठी कपात
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) अध्यक्ष रवी अग्रवाल यांनी ‘PRARAMBH’ (प्रारंभ) या नवीन उपक्रमाची घोषणा केली आहे. हा उपक्रम ‘नवीन आयकर कायदा, 2025’ च्या अंमलबजावणीचा एक महत्त्वाचा भाग आहे. कर प्रणाली अधिक सोपी करण्यासाठी विभागाने नियम आणि अर्जांच्या (Forms) संख्येत निम्म्याने कपात केली आहे. अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमांची संख्या 510 वरून 333 पर्यंत, तर अर्जांची संख्या 399 वरून थेट 190 पर्यंत कमी करण्यात आली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे देशातील 6 कोटींहून अधिक करदात्यांना अनावश्यक कायदेशीर पूर्ततेच्या ओझ्यातून मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा – GST Collection: जीएसटी संकलनाचा ‘महाविक्रम’; मार्चमध्ये दोन लाख कोटींचा टप्पा पार, जागतिक मंदीच्या सावटात भारतीय अर्थव्यवस्थेची ऐतिहासिक भरारी

सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया; तांत्रिक क्षमतेबाबत चिंता
सरकारने हे नवीन एआय पोर्टल सुरू केल्यानंतर सोशल मीडियावर करदात्यांनी याचे स्वागत केले आहे. मात्र, स्वागत करतानाच वापरकर्त्यांनी एक महत्त्वाची चिंताही व्यक्त केली आहे. दरवर्षी कर भरण्याच्या शेवटच्या दिवसांत (Peak Season) आयकर विभागाचे पोर्टल संथ होण्याच्या किंवा ‘क्रॅश’ होण्याच्या तक्रारी येतात. याच पार्श्वभूमीवर, “यावेळी पोर्टलची कार्यक्षमता केवळ कागदावर किंवा आभासी न राहता प्रत्यक्ष कामाच्या वेळीही टिकून राहावी,” अशी अपेक्षा एका वापरकर्त्याने व्यक्त केली आहे. ‘कर साथी’ खरोखरच ही तांत्रिक आव्हाने पेलणार का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number