MVA Protest On Onion Prices : गळ्यात कांद्याची माळ, बैलगाडीवर स्वार…, कांदे दरवाढीविरोधात मविआचे ‘रास्ता रोको’ आंदोलन; ‘या’ जिल्ह्यांमध्ये उमटले पडसाद

काल सरकारने नाफेड मार्फत खरेदी होणाऱ्या कांद्याला नवीन 1580 रुपये भाव जाहीर केला. मात्र सरकारच्या या निर्णयावर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली.

MVA Protest On Onion Prices : गळ्यात कांद्याची माळ, बैलगाडीवर स्वार…, कांदे दरवाढीविरोधात मविआचे ‘रास्ता रोको’ आंदोलन; ‘या’ जिल्ह्यांमध्ये उमटले पडसाद

काल सरकारने नाफेड मार्फत खरेदी होणाऱ्या कांद्याला नवीन 1580 रुपये भाव जाहीर केला. मात्र सरकारच्या या निर्णयावर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. सरकारने 2 ते 2500 हजार रुपयांचा भाव द्यावा आणि बाजारातून कांदा खरेदी करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. हा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी असल्याचे आरोप करत काही कांदा उत्पादक शेतकरी संघटनांनी सरकारच्या या निर्णयानंतर नाराजीचा सूर देखील उमटला आहे.

याच निषेधार्थ संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ‘रास्ता रोको’ आंदोलनाची हाक दिली आहे. यावेळी बाजार समितीसमोर गंगापूर-वैजापूर मुख्य रस्त्यावर, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आणि सोलापुरातील मार्केट यार्ड परिसरात हैद्राबाद-पुणे राष्ट्रीय महामार्गावर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून रस्तारोको आंदोलन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या क्रांती महामोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधान परिषदचे आमदार अंबादास दानवे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासह मविआमधील सर्वच पक्षांचे नेते सहभागी झाले आहेत. तसेच अनेक नेत्यांनी गळ्यात कांद्याची माळ घातल  सरकारच्या धोरणाविरोधात मोठी घोषणाबाजी केली आहे. 

हेही वाचा- New Onion rates: कांदा उत्पादकांसाठी सरकारचा मोठा निर्णय! कांद्याच्या दरात 345 रुपयांची वाढ; मात्र शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील परिस्थिती-
कांद्याच्या भावात होणाऱ्या घसरण्याच्या पार्श्वभूमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्रोष आहे. केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी आज नाशिकच्या चांदवडमध्ये आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कांदा उत्पादक शेतकरी क्रांती मोर्चा काढण्यात आला आहे. तसेच दिल्लीकडे जाणारा मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग रोखून दिल्लीकडे जाणारा रस्ता रोखण्यात आला आहे. आंदोलनात महाविकास आघाडीचे नेते व हजारो कांदा उत्पादक आंदोलनात सहभागी झाले आहे. 

सोलापूरात प्रणिती शिंदेंचा जनआक्रोश 
सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे यांनी जनआक्रोश रस्ता रोको आंदोलन केले आहे. सोलापुरातील मार्केट यार्ड परिसरात हैद्राबाद-पुणे राष्ट्रीय महामार्गावर साखळी पद्धतीने रस्तारोको आंदोलन सुरु आहे. इंधन दरवाढ, कांद्याला हमीभाव, सोयाबीन पीक विमा, खत-बियाण्याच्या वाढत्या किंमती, नीट घोटाळा या प्रश्नांवर हे आंदोलन उभारण्यात आले आहे. मात्र या रस्तारोको आंदोलनाला सोलापूर पोलीस प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलेली नाही. दरम्यान या रस्तारोको आंदोलनामुळे मागील काही वेळेपासून हैद्राबाद-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर गंगापूर-वैजापूर मुख्य रस्त्यावर कांदा फेकत शेतकऱ्यांकडूम ‘रास्ता रोको’ आंदोलन केले जात आहे. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली आहे. सोमवारी दुपारच्या सत्रात गंगापूर बाजार समितीत अनेक शेतकरी कांदा विक्रीसाठी घेऊन आले होते. मात्र, लिलाव सुरू झाल्यावर कांद्याचे दर ऐकून शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला. मिळणाऱ्या दरातून बाजारात आणलेल्या वाहनाचे भाडेही निघत नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number