Tuesday, November 11, 2025 11:04:07 AM

America Planes Collide: अमेरिकेत विमान अपघात! न्यू यॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर विमानांची टक्कर,पहा व्हिडिओ

या दुर्घटनेत एका फ्लाइट अटेंडंटला किरकोळ दुखापत झाली. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.

america planes collide अमेरिकेत विमान अपघात न्यू यॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर विमानांची टक्करपहा व्हिडिओ

America Planes Collide: अमेरिकेत आणखी एक विमान अपघात घडला आहे. न्यू यॉर्कमधील लागार्डिया विमानतळावर बुधवारीसंध्याकाळी दोन विमानांची टक्कर झाली. एबीसी न्यूजच्या अहवालानुसार, एका विमानाचा उजवा पंख दुसऱ्या विमानाच्या पुढच्या भागाशी आदळला.

अपघातात एक जखमी

या दुर्घटनेत एका फ्लाइट अटेंडंटला किरकोळ दुखापत झाली. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. एअर ट्रॅफिक कंट्रोल ऑडिओमध्ये पायलटने सांगितले की, या अपघातामुळे विमानाचा कॉकपिट, विंडस्क्रीन तसेच स्क्रीनचे मोठे नुकसान झाले. 

हेही वाचा - Defence Minister Rajnath Singh: “तुमचा इतिहास आणि भूगोल बदलू”, संरक्षमंत्री राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला कडक इशारा

विमानतळावर आधीही अपघात

लागार्डिया विमानतळावर अपघात होण्याचे ही पहिली वेळ नाही. सीबीएस न्यूजच्या अहवालानुसार, मार्चमध्ये लँडिंग दरम्यान डेल्टा विमानाचा पंख धावपट्टीवर आदळला होता. यापूर्वी शार्लोट डग्लस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येणारे विमान टॅक्सी करत असताना दुसऱ्या विमानाशी आदळले होते.

हेही वाचा - China K Visa: चीनचा नवा K व्हिसा चर्चेत; परदेशी व्यावसायिकांसाठी संधी की आव्हान?

अमेरिकेत विमान अपघातांची वारंवारता

या वर्षी अमेरिकेत अनेक गंभीर विमान अपघात घडले आहेत. जानेवारीत, अमेरिकन आर्मीचे ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर आणि अमेरिकन एअरलाइन्सचे प्रादेशिक जेट रेगन वॉशिंग्टन राष्ट्रीय विमानतळाजवळ हवेतच धडकले होते, ज्यात 67 जणांचा मृत्यू झाला होता. तताथी, 30 जानेवारीला फिलाडेल्फियामध्ये एअर अॅम्ब्युलन्स कोसळली, ज्यात आठ जणांचा मृत्यू झाला होते. अमेरिकेत विमान अपघातांचे प्रमाण वाढत असल्यामुळे विमानतळ सुरक्षा उपाय आणि एअर ट्रॅफिक व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होत आहेत. 


सम्बन्धित सामग्री