Thursday, June 11, 2026 09:30:53 PM

Digital Credit Card : आता खात्यात बॅलन्स नसला तरी होणार पेमेंट; ही बँक देत आहे डिजिटल क्रेडिट कार्डवरून उधारीची सुविधा

'RuPay' नेटवर्कवर आधारित हे कार्ड ग्राहकांना क्रेडिट-ऑन-UPI ची सुविधा देणारा एक प्रगत आणि महत्त्वाचा टप्पा  ठरणार आहे.

digital credit card  आता खात्यात बॅलन्स नसला तरी होणार पेमेंट ही बँक देत आहे डिजिटल क्रेडिट कार्डवरून उधारीची सुविधा

PNB Kiwi Credit Card : पंजाब नॅशनल बँकेने (PNB) आपल्या सुमारे 18 कोटी ग्राहकांचा डिजिटल व्यवहारांचा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी 'Kiwi' या फिनटेक कंपनीशी हातमिळवणी केली आहे. या भागीदारी अंतर्गत 'PNB Kiwi' क्रेडिट कार्ड लाँच करण्यात आले असून, ते थेट UPI शी जोडले जाईल. या नवीन सुविधेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, तुमच्या बँक खात्यात पैसे नसतानाही तुम्ही UPI द्वारे खरेदी किंवा पेमेंट करू शकाल. 'RuPay' नेटवर्कवर आधारित हे कार्ड ग्राहकांना क्रेडिट-ऑन-UPI ची सुविधा देणारा एक प्रगत आणि महत्त्वाचा टप्पा  ठरणार आहे.

विनाशुल्क सुविधा आणि आकर्षक कॅशबॅक
ग्राहकांसाठी हे क्रेडिट कार्ड अत्यंत फायदेशीर ठरण्याचे कारण म्हणजे यावर कोणतेही छुपे खर्च नाहीत. PNB च्या या डिजिटल कार्डसाठी ग्राहकांना कोणतीही जॉइनिंग फी किंवा वार्षिक शुल्क (Annual Fee) भरावे लागणार नाही. याशिवाय, ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या वापरकर्त्यांना 0.5 ते 1.5 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक देखील मिळणार आहे. हे कार्ड पूर्णपणे डिजिटल स्वरूपाचे असल्याने, यासाठी कोणत्याही कागदी कागदपत्रांच्या कटकटीशिवाय घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

हेही वाचा - Ruling On Cash Transaction : घरातील रोख रक्कम बँकेत जमा केल्यास कर आकारला जाणार का? आयकर विभागाने दिला मोठा निर्णय

ग्रामीण भागातील ग्राहकांवर विशेष लक्ष
पीएनबीचे कार्यकारी संचालक बिभू प्रसाद महापात्रा यांनी सांगितले की, देशातील वाढत्या डिजिटल अर्थव्यवस्थेत UPI ची भूमिका महत्त्वाची आहे. बँकेच्या एकूण 10,000 पेक्षा जास्त शाखांपैकी सुमारे 60 टक्के शाखा निमशहरी आणि ग्रामीण भागात आहेत. या विस्तीर्ण जाळ्याचा वापर करून, ज्या लोकांपर्यंत अद्याप औपचारिक क्रेडिट सुविधा पोहोचलेली नाही, अशा ग्रामीण ग्राहकांना डिजिटल बँकिंगच्या प्रवाहात आणण्याचा बँकेचा मानस आहे. यामुळे छोट्या शहरांमधील आर्थिक व्यवहारांना मोठी गती मिळण्याची अपेक्षा आहे.

क्रे़डिट-ऑन-UPI चा नवा अनुभव
हे नवीन फिचर वापरण्यासाठी ग्राहकांना फक्त त्यांचे पीएनबी किवी कार्ड यूपीआय अ‍ॅपशी लिंक करावे लागेल. यानंतर, स्कॅन आणि पे (Scan & Pay) करताना बँक खात्याऐवजी क्रेडिट कार्डचा पर्याय निवडून पेमेंट करता येईल. यामुळे खिशात प्रत्यक्ष क्रेडिट कार्ड ठेवण्याची गरज उरणार नाही. पेमेंटची प्रक्रिया अधिक जलद आणि सुरक्षित व्हावी, यासाठी पीएनबी आणि किवीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. डिजिटल क्रांतीच्या या युगात हे पाऊल सर्वसामान्यांसाठी आर्थिक स्वातंत्र्य देणारे ठरेल.

हेही वाचा - Credit Card : क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड पॉइंट्सवर टॅक्स भरावा लागेल का? जाणून घ्या प्राप्तिकर विभागाचे नवीन नियम


सम्बन्धित सामग्री