HSRP Number Plate Deadline: पुणेकरांनो सावधान! 15 फेब्रुवारीपासून विना-HSRP वाहनांवर कारवाईचा बडगा; ‘इतका’ भरवा लागणार दंड

येत्या 15 फेब्रुवारीपासून राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवून दंड आकारला जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.<br/>

HSRP Number Plate Deadline: पुणेकरांनो सावधान! 15 फेब्रुवारीपासून विना-HSRP वाहनांवर कारवाईचा बडगा; ‘इतका’ भरवा लागणार दंड

HSRP Number Plate Deadline: तुमच्या वाहनाला अद्याप 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (HSRP) बसवलेली नसेल, तर आता तुमच्याकडे अवघे काही दिवस शिल्लक आहेत. वारंवार मुदतवाढ देऊनही वाहनधारकांच्या निरुत्साही प्रतिसादामुळे अखेर परिवहन विभागाने कठोर पवित्रा घेतला आहे. येत्या 15 फेब्रुवारीपासून राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवून दंड आकारला जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे शहराची सद्यस्थिती आणि धक्कादायक आकडेवारी
पुणे शहरात वाहनांची संख्या मोठी असली तरी नियमांच्या पालनाबाबत मोठी उदासीनता दिसून येत आहे. आकडेवारीनुसार, पुण्यात सुमारे 25 लाख वाहने असून त्यापैकी केवळ 10.70 लाख वाहनांनी नोंदणी केली आहे. प्रत्यक्षात नंबरप्लेट बसवलेल्या वाहनांची संख्या 8.62 लाख इतकीच आहे. याचाच अर्थ अद्यापही शहरात सुमारे 15 लाख वाहनांना नवीन नंबरप्लेट बसवणे बाकी आहे, जे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे.

दंडाचे स्वरूप आणि संयुक्त तपासणी मोहीम
परिवहन विभागाने आतापर्यंत 30 एप्रिल ते 31 डिसेंबर अशी 5 वेळा मुदतवाढ दिली होती. मात्र, आता सवलतीचा काळ संपल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना 1,000 रुपयांपासून ते 10,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. या विशेष मोहिमेत केवळ नंबरप्लेटच नव्हे, तर विमा (Insurance), पीयूसी (PUC) आणि ड्रायव्हिंग लायसन्सचीही कडक पडताळणी केली जाणार आहे. ज्यांनी मुदतीपूर्वी नोंदणी केली आहे त्यांना काहीसा दिलासा मिळेल, मात्र नवीन नोंदणी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई अटळ आहे.

हेही वाचा – Bank Strike News: मोठी बातमी, अन्यथा होईल मनस्ताप! बँकेचे काम उद्यावर ढकलताय; कारण काय ?

सुरक्षेसाठी HSRP अनिवार्य; रिक्षा संघटनांची मुदतवाढीची मागणी
वाहनांचा गैरवापर रोखणे, चोरीच्या वाहनांचा माग काढणे सुलभ करणे आणि देशभर एकसमान प्रणाली लागू करणे या उद्देशाने ही मोहीम राबवली जात आहे. परिवहन अधिकाऱ्यांच्या मते, वाहनधारकांना पुरेशी संधी देण्यात आली असून आता शिस्त लावण्यासाठी कारवाईशिवाय पर्याय नाही. दरम्यान, कामाचा प्रचंड ओघ लक्षात घेता 'रिक्षा फेडरेशन'चे बापू भावे यांनी प्रशासनाला किमान 2 महिने मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे. मात्र, विभाग सध्या 15 फेब्रुवारीच्या कारवाईच्या निर्णयावर ठाम आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number