Railway Recruitment 2026: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! 312 पदांची भरती, 44 हजारांपर्यंत पगार; अर्जाची अंतिम तारीख जवळ

रेल्वे भरती बोर्डाकडून आइसोलेटेड कॅटेगरी अंतर्गत 312 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Railway Recruitment 2026: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! 312 पदांची भरती, 44 हजारांपर्यंत पगार; अर्जाची अंतिम तारीख जवळ

Railway Recruitment 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी रेल्वे भरती बोर्डाने (RRB) दिलासा देणारी बातमी दिली आहे. रेल्वेमध्ये प्रतिष्ठित आणि सुरक्षित नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे. आरआरबीकडून ‘आइसोलेटेड कॅटेगरी’ अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, एकूण 312 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

या भरती प्रक्रियेमध्ये अनेक महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या पदांचा समावेश आहे. यामध्ये ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, चीफ लॉ असिस्टंट, पब्लिक प्रॉसिक्यूटर, स्टाफ अँड वेल्फेअर इन्स्पेक्टर, सीनियर पब्लिक इन्स्पेक्टर यांसह वैज्ञानिक आणि तांत्रिक पदांचाही समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या भरतीत सर्वाधिक जागा ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी उपलब्ध आहेत, त्यामुळे भाषा विषयात शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी ठरू शकते.

आरआरबीने जाहीर केलेल्या माहितीनुसार, ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटरसाठी 200 हून अधिक जागा असून, त्यानंतर लॅब असिस्टंट ग्रेड-3, स्टाफ अँड वेल्फेअर इन्स्पेक्टर आणि कायदेशीर पदांसाठीही चांगल्या संख्येने पदे उपलब्ध आहेत. वैज्ञानिक सहाय्यक आणि सुपरवायझर यांसारख्या तांत्रिक पदांसाठी मर्यादित पण महत्त्वाच्या जागा देण्यात आल्या आहेत.

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. भाषा विषयातील पदांसाठी संबंधित विषयात पदवी आवश्यक आहे. कायदेशीर पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी (LLB) असणे बंधनकारक आहे. तर वैज्ञानिक आणि तांत्रिक पदांसाठी विज्ञान शाखेतील पदवी किंवा डिप्लोमा आवश्यक मानला जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे महत्त्वाचे आहे.

वयोमर्यादेच्या बाबतीत, किमान वय 18 वर्षे निश्चित करण्यात आले असून कमाल वयोमर्यादा पदानुसार 30 ते 40 वर्षांपर्यंत आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि इतर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक पगार आणि विविध शासकीय सुविधा मिळणार आहेत. काही पदांसाठी सुरुवातीचा मासिक पगार सुमारे 35,000 रुपयांपासून सुरू होतो, तर वरिष्ठ पदांसाठी जवळपास 44,900 रुपये मासिक वेतन दिलं जाणार आहे. याशिवाय महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता आणि इतर लाभ मिळणार आहेत.

अर्ज शुल्काच्या बाबतीत, जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क निश्चित करण्यात आले असून, एससी-एसटी उमेदवारांना सवलतीचे शुल्क आकारले जाणार आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने असून, इच्छुक उमेदवार 31 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज करू शकतात.

रेल्वेमधील स्थिर, सन्मानजनक आणि दीर्घकालीन करिअरची संधी शोधणाऱ्यांसाठी ही भरती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. वेळ न दवडता पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन करण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number