Ketan Agarwal Case: ‘सोनम जामिनावर सुटली नसती तर…’ पुण्यातील केतन अग्रवाल त्याकांडानंतर राजा रघुवंशीच्या आईचा संताप; म्हणाली…

पुण्यातील केतन अगरवाल हत्या प्रकरणानंतर राजा रघुवंशी यांच्या कुटुंबीयांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सोनम रघुवंशीला जामीन मिळाल्यामुळे चुकीचा संदेश गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

Ketan Agarwal Case: ‘सोनम जामिनावर सुटली नसती तर…’ पुण्यातील केतन अग्रवाल त्याकांडानंतर राजा रघुवंशीच्या आईचा संताप; म्हणाली…

पुण्यातील केतन अगरवाल हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला असताना आता या प्रकरणाचे पडसाद मेघालयातील गाजलेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणातही उमटताना दिसत आहेत. पुण्यातील घटनेनंतर राजा रघुवंशी यांच्या कुटुंबीयांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली असून, दोन्ही घटनांमध्ये अनेक बाबतीत साम्य असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पुण्यातील लोहगड परिसरात केतन अगरवाल यांचा मृत्यू झाल्यानंतर तपासात त्याची नियोजित वधू सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणानंतर गेल्या वर्षी मेघालयमध्ये घडलेल्या राजा रघुवंशी हत्येची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे. राजा रघुवंशी यांची हत्या त्यांच्या पत्नी सोनम रघुवंशी आणि तिच्या कथित प्रियकराने केल्याचा आरोप आहे.

या दोन्ही प्रकरणांमध्ये नियोजनाची पद्धत, निर्जन ठिकाणांची निवड आणि गुन्हा घडवून आणण्याची शैली यात साधर्म्य असल्याचे राजा रघुवंशी यांचे कुटुंबीय सांगत आहेत.

राजा रघुवंशी यांच्या आई उमा रघुवंशी यांनी या संपूर्ण प्रकरणावर बोलताना गंभीर आरोप केला. “राजाच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी सोनमला जामीन मिळाल्यानंतर समाजात चुकीचा संदेश गेला. त्यामुळेच सियासारख्या व्यक्तींना अशा प्रकारचे कृत्य करण्याचे धाडस मिळाले असावे,” असे त्या म्हणाल्या. अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राजा यांचा भाऊ सचिन रघुवंशी यांनीही पुण्यातील घटनेबाबत दुःख व्यक्त केले. त्यांनी केतन अगरवाल यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करत, या प्रकरणात तातडीने आणि कठोर कारवाईची मागणी केली.

हेही वाचा: Ketan Agrawal Death Case: केतनला लोहगडावरून का ढकललं? सियाचा पोलिसांसमोर गुन्ह्याचा धक्कादायक खुलासा

“जर सियाला हे लग्न मान्य नव्हते, तर तिने स्पष्टपणे नकार देऊ शकला असता. एखाद्याचा जीव घेणे हा कोणत्याही परिस्थितीत पर्याय ठरू शकत नाही,” असे सचिन म्हणाले. तसेच, कायद्याची भीती निर्माण होण्यासाठी अशा गुन्ह्यांमध्ये कठोर शिक्षा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

केतन अगरवाल हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळल्याचे सचिन यांनी नमूद केले. “प्रत्येक आरोपीने हे लक्षात घ्यायला हवे की, ज्या व्यक्तीचा जीव घेतला जातो, तो कोणाचा तरी मुलगा, भाऊ किंवा कुटुंबाचा आधार असतो,” असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पुणे आणि मेघालय या दोन्ही प्रकरणांमध्ये साम्य असल्याच्या चर्चांना उधाण आले असून, सामाजिक आणि कायदेशीर स्तरावरही यावर व्यापक चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number